रात्री झोपताना स्वेटर आणि मोजे घालून झोपणं पडू शकतं महागात, काय होतात परिणाम
हिवाळा सुरु झाला आहे. थंडी सुरु झाल्यानंतर लोकं स्वेटर आणि सॉक्स बाहेर काढतात. अनेकांनी थंडीत स्वेटर आणि सॉक्स घालून झोपण्याची सवय असते. पण अनेकांना माहित नाही की असं करणं हे आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकतं. हिवाळ्यात तुम्हाला झोपताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे जाणून घ्या.
कडाक्याची थंडी सुरु झाली आहे. अनेक ठिकाणी हळूहळू थंडीत वाढ होताना दिसत आहे. रात्रीच्या वेळी पारा आणखी घसरत आहे. या काळात स्वेटर आणि मोजे यांची मागणी वाढते. पण थंडीमध्ये मोजे किंवा स्वेटर घालून झोपणे आरोग्यासाठी चांगले नाही. या सवयीचा तुमच्या झोपेसोबतच आरोग्यावरही खोलवर परिणाम होतो. त्याचे दुष्परिणाम काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत.
लोकरचे कपडे घालून झोपणे हे हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी अत्यंत घातक ठरू शकते. कारण जाड तंतू आणि लोकरीच्या कपड्यांचे छोटे छिद्र आपल्या शरीरातील उष्णता आत अडकवतात. हिवाळ्यात लोकरीचे कपडे घातल्याने शरीराचे तापमान अधिक वाढते. हे वाढलेले तापमान मधुमेह आणि हृदयरोगींसाठी घातक ठरू शकते.
डॉक्टरांच्या मते, हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकसतात. त्यामुळे जर आपण लोकरीचे कपडे घालून झोपलो तर शरीराला खूप उष्णता जाणवते. यामुळे अस्वस्थता आणि रक्तदाब कमी होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे झोपताना नेहमी सुती कपडे घालावेत. असा सल्ला डॉक्टर देतात.
लोकरीचे कपडे घातल्याने शरीराचे तापमान वाढते. यामुळे आपल्याला घाम देखील फुटतो. त्यामुळे त्वचेला जळजळ आणि खाज येऊ शकते. कोरडी त्वचा असलेल्या व्यक्तींसाठी ही समस्या गंभीर होऊ शकते. कारण लोकरीचे कपडे घातल्याने त्वचा अधिक कोरडी होऊ शकते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी हलके कपडे घालणे आणि त्वचेला मॉइश्चरायझ करणे चांगले असते.
रात्री झोपताना या गोष्टी करा
- रात्री झोपत असलेल्या खोलीचे तापमान 18-20 अंश सेल्सिअस दरम्यान ठेवा. जास्त उष्णता असेल तर त्यामुशे घाम येतो आणि झोपेमध्ये व्यत्यय येतो.
- झोपण्यापूर्वी खोलीतील लाईट पूर्णपणे बंद करा. अंधारामुळे मेलाटोनिन नावाच्या हार्मोनचे उत्पादन वाढते जे झोपेवर नियंत्रण ठेवते.
- झोपण्याच्या आधी टीव्ही, मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट कधीच वापरू नका. ही उपकरणे झोपेमध्ये व्यत्यय आणतात.
- चांगली झोप हवी असेल तर तुमच्या शरीराला योग्य आधार द्या. झोपताना चांगली गादी आणि उशी निवडा.
- एकाच वेळी झोपण्याचा आणि उठण्याची वेळ ठेवा. यामुळे तुमच्या शरीराची सवय होईल आणि तुम्हाला झोप लागणे सोपे जाईल.
- झोपण्यापूर्वी कॅफिन आणि अल्कोहोलचे सेवन करू नका. या दोन्हीमुळे झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो.
डिस्केलमर : झोप येत नसेल किंवा इतर कोणत्याही समस्या असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.