वाढलेले वजन कंट्रोलमध्ये आणायचे? मग, दररोज सकाळी प्या ‘हे’ खास पेय

वाढलेल्या वजनामुळे अनेकजण त्रस्त असतात. त्यामध्ये ही सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपण व्यायाम करण्यासाठी कुठे बाहेरही जाऊ शकत नाही.

वाढलेले वजन कंट्रोलमध्ये आणायचे? मग, दररोज सकाळी प्या 'हे' खास पेय
आयुर्वेदिक काढा
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 7:01 AM

मुंबई : वाढलेल्या वजनामुळे अनेकजण त्रस्त असतात. त्यामध्ये ही सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपण व्यायाम करण्यासाठी कुठे बाहेरही जाऊ शकत नाही. त्यामध्येही अनेकांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. यामुळे वजन हे वाढतच चालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण आरोग्याची विशेष काळजी घेत आपले वजन कमी करण्यावर भर दिला पाहिजे. कारण वाढलेले वजन हे अनेक आजारांना निमंत्रणच देत असते. (Special drink for weight loss)

वजन कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. हे पेय आपण दररोज पिले तर आपले वजन कमी होण्यास नक्कीच मदत होईल. यासाठी आपल्याला एक लिंबू, हळद, काळी मिरी आणि गरम पाणी लागणार आहे. यासाठी सर्वात प्रथम पाणी गरम करण्यासाठी मंद आचेवर ठेवा आणि त्यामध्ये काळी मिरी, हळद मिक्स करा, पाणी चांगले उकळूद्या आणि शेवटी यामध्ये लिंबू मिक्स करा. हे पाणी पिल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होईल. दिवसातून एक वेळा तरी हे पाणी घेतले पाहिजे.

लिंबामध्ये ‘व्हिटॅमिन सी’ची उपलब्धता जास्त असल्यामुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. लिंबू सेवनामुळे रक्त शुद्धीकरणासाठी मदत होते. त्यामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या विविध विषांपासून मुक्तता मिळू शकते. लिंबामध्ये औषधी गुणधर्मही आहेत. रोज हळद, लिंबू आणि मध घेतल्याने लठ्ठपणा देखील दूर होण्यास मदत होते. तसेच, त्वचेशी संबंधित समस्यांपासून मुक्तता देखील होते. हळदीमुळे आपल्या शरीरात साखरेची पातळी व्यवस्थित राहते.

आपल्या शरीरात तयार होणार्‍या विषारी पदार्थांमुळे आपल्या यकृताला मोठा धोका असतो. परंतु हळद, लिंबू आणि मध यांचे सेवन केल्यास यकृत या विषारी पदार्थांच्या प्रभावापासून वाचतो. काळी मिरी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. काळी मिरी बर्‍याच रोगांमध्येही हे प्रभावी मानली जाते. काळ्यामिरीत पेपरिन नावाचा घटक असतो. हा घटक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. यात लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, जस्त, क्रोमियम, व्हिटामिन ए आणि इतर पोषक गुणधर्म आढळतात.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Special drink for weight loss)

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.