दुधाच्या चहाला गुडबाय बोला आणि ‘हा’ खास चहा प्या, वाढेल रोगप्रतिकारक शक्ती
सध्याच्या कोरोनाच्या काळात आरोग्याची विशेष काळजी ही घेतली पाहिजे. हेल्दी आहार आणि व्याायाम हा देखील महत्वाचा आहे.
मुंबई : सध्याच्या कोरोनाच्या काळात आरोग्याची विशेष काळजी ही घेतली पाहिजे. हेल्दी आहार आणि व्याायाम हा महत्वाचा आहे. मात्र, जर आपल्याला कोरोनापासून दूर राहिचे असेल तर आपण आहारात रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असेच अन्न घेतले पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर कोरोनापासून आपण दूर राहू शकतो. (Special tea to boost the immune system)
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. सर्वात अगोदर एका भांड्यात पाणी घ्या आणि ते गरम होऊद्या. त्यानंतर केळीचे साल काढा केळीचे काप करून घ्या आणि पाण्यात टाका. 10-20 मिनिटे उकळी येऊ द्या. त्यानंतर त्यात दालचिनीची पूड घाला आणि गॅस बंद करा. चहा गाळून घ्या आता केळीचा चहा तयार आहे. हा चहा पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे आपल्याला चांगली झोप लागते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
केळीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखे खनिजे असतात, जे रक्तदाब कमी करण्यास तसेच स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हळद अतिशय गुणकारी आहे. हळदीमध्ये अँटीव्हायरल, अँटीफंगल गुण असतात. ज्यामुळे सर्दी, ताप, खोकला यासारख्या विकारावर हळद गुणकारी ठरते. तसेच आजार लवकर बरा होण्यासही मदत मिळते. हृदय निरोगी ठेवण्यासाठीही हळद अतिशय प्रभावी ठरते. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.
यामुळे आपले हृदय निरोगी राहण्यास मदत होते. हळदीचे दूध आपल्या रक्तातील साखरेची पातळी संतुलित करते. ज्यामुळे आपले आरोग्य देखील निरोगी राहते. एक चिमूटभर हळद दुधात मिसळणे आपल्यासाठी फायदेशीर आहे. हळदीच्या दुधाचे आणखी फायदे करून घ्यायचे असतील, तर हळदीच्या पावडर ऐवजी कच्ची हळद दुधामध्ये घालून ते दुध प्यावे. हळदीयुक्त दुधाच्या सेवनाने चांगली झोप लागते. दुधात अमीनो अॅसिड असतात, जे चांगली झोप देण्यास प्रभावी ठरतात.
(टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Special tea to boost the immune system)