Beauty Tips : चेहर्यावरील नको असलेले तीळ काढून टाकण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा !
चेहऱ्यावरील तीळ वेगळ्या प्रकारे सौंदर्य वाढवते. चेहऱ्यावर एक किंवा दोन तीळ चांगले वाटतात.
मुंबई : चेहऱ्यावरील तीळ वेगळ्या प्रकारे सौंदर्य वाढवते. चेहऱ्यावर एक किंवा दोन तीळ चांगले वाटतात. मात्र, काही लोकांच्या चेहऱ्यावर त्यापेक्षाही अधिक तीळ येतात. अशा परिस्थितीत सौंदर्य वाढण्याऐवजी कमी होते. चेहऱ्यावरील हे तीळ काढण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे उपचार करतात. पण चेहऱ्यावरील तीळ काही कमी होत नाही. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, घरगुती उपचार घेऊन चेहऱ्यावरील तीळ कसे काढावे. चला तर मग बघूयात…(Special tips for removing mole on the face)
लसूण लसूणचा प्रभाव खूप गरम मानला जातो, म्हणून चेहऱ्यावरील तीळ काढून टाकण्यासाठी हे प्रभावी आहे. यासाठी आपल्याला लसूण आणि लवंगाचे मिश्रण करून पेस्ट तयार करावी लागेल. ही पेस्ट तिळावर लावा आणि पेस्ट सुकण्यास सुरवात झाल्यावर मलमपट्टी चिकटवून ठेवा. एक आठवडा ही पेस्ट सतत लावत राहा.
अॅपल व्हिनेगर अॅपल व्हिनेगर तीळ काढून टाकण्यासाठी वापरले जाते. यामध्ये टेट्रिक अॅसिड आहे जे तीळ कोरडे करते, ज्यामुळे काही काळानंतर तीळ गळून पडतात. यासाठी आपल्याला तिळावर व्हिनेगर लावावे लागेल आणि त्यावर मलमपट्टी लावा. ही पट्टी रात्रभर ठेवा आणि सकाळी पाण्याने धुवा.
कोरफड जेल कोरफड ही एक वनस्पती आहे जी त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी वापरली जाते. त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म आहे. कोरफड जेल तीळ काढून टाकण्यास मदत करते. सर्वप्रथम तीळ स्वच्छ करा आणि नंतर कोरफड जेल लावणे. सुमारे 2 तास मलमपट्टी लावा आणि नंतर ते पाण्याने धुवा.
कांदा कांद्याचा रस केवळ केसांसाठी फायदेशीर नाही तर चेहऱ्यावरील तीळ काढून टाकण्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. त्यासाठी कांद्याचा रस तीळावर कापसाच्या साहाय्याने लावावा व सुमारे दोन तासानंतर ते पाण्याने धुवा. हा उपाय दररोज करा आणि काही दिवसातच तुम्हाला तिळापासून मुक्तता मिळेल.
कोथिंबीर कोथिंबीरच्या काही पानांची पेस्ट करा. ही पेस्ट काही दिवस तुम्हाला नको असलेल्या तिळावर नियमित लावा. अननसाचा रस आणि पाव कप सैंधव मीठ एकत्र करा. या मिश्रणाने स्क्रब केल्यास चेहर्यावरील तिळ कमी होण्यास मदत होईल.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!
Immunity Booster | थंडीच्या दिवसांत आवळ्याचा रस आरोग्यवर्धक, इम्युनिटी वाढवण्यासाठी ‘हे’ नक्की ट्राय करा!https://t.co/XPmKiIDsHE#ImmunityBooster #AmlaJuice
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 28, 2020
(Special tips for removing mole on the face)