Immunity Boost : कोरोनाच्या काळात अशाप्रकारे वाढवा आपली रोगप्रतिकारक शक्ती !

देशामध्ये पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोनामुळे अनेक ठिकाणी नाईट कर्फ्यू देखील लावण्यात आले आहेत.

Immunity Boost : कोरोनाच्या काळात अशाप्रकारे वाढवा आपली रोगप्रतिकारक शक्ती !
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 10:08 AM

मुंबई : देशामध्ये पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोनामुळे अनेक ठिकाणी नाईट कर्फ्यू देखील लावण्यात आले आहेत. यासर्व परिस्थितीमध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेत कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवावी लागणार आहे. यासाठी आपल्याला चांगला आहार घ्यावा लागणार आहे. चला तर मग बघूयात नेमका कुठला आहार घेऊन आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकतो. (Special tips to boost the immune system)

अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह कमी करतात. ते आपल्या शरीरात वाढणार्‍या फ्री रॅडिकल्स (बॅक्टेरिया) विरूद्ध लढायला मदत करतात. अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स बर्‍याच फळांमध्ये, भाज्या आणि धान्यात आढळतात. लिंबूवर्गीय फळे शरीरात व्हिटॅमिन सीचे प्रमाण वाढवतात. जे संक्रमणाशी लढण्यासाठी उपयुक्त आहेत. आपण आपल्या आहारात पेरू, डाळिंब, लिंबू, संत्री, बदाम, गाजर, रताळे, केळी, शेंगदाणे, सोयाबीन, टोमॅटो हे समाविष्ट करा .ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते.

पारंपारिक मसाले जसे हळद, आले आणि काळी मिरी त्यांच्या इम्युनोमोडायलेटरी आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांकरिता ओळखले जाते. लवंगा, दालचिनी, वेलची यासारखे मसाले देखील शरीराच्या अनेक समस्या सोडवतात. या मसाल्यांमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आणि अँटीऑक्सिडेंट असतात यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. रिकाम्या पोटी तुळशीचे सात-आठ पाने खाणे देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी झोप देखील अत्यंत महत्वाची आहे. चांगल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी योग्य झोप घेणे देखील आवश्यक आहे. ताजे फळे, भाज्या या आपल्या शरीरात उर्जा देतात ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. अगोदर खाल्लेले अन्न पचन झाल्यावरच परत अन्न खावे. कधीही ओव्हरलोडिंग करू नये. याशिवाय आपण सूप, नारळपाणी आणि काकडीचे इत्यादी हलके पर्याय खाऊ शकता. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

(Special tips to boost the immune system)

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.