रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी खास टिप्स, वाचा !
कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये स्वत: ला सुरक्षित ठेवणे अतिशय महत्वाचे झाले आहे.
मुंबई : कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये स्वत: ला सुरक्षित ठेवणे अतिशय महत्वाचे झाले आहे. या दरम्यान सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी काही खास टिप्स सांगितल्या आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला काही वेगळे करायचे नसून थोडासा बदल आपल्या जीवनशैलीत करायचा आहे. (Special tips to boost the immune system and stay healthy)
1. न्यूट्रिशनिस्टच्या म्हणण्यानुसार स्वयंपाकघरात फक्त लोखंडी कडई, तवा वापरावे. हे आपली उर्जा आणि एचबी पातळी चांगली ठेवते. असे मानले जाते की लोखंडाच्या भांड्यांमध्ये शिजविलेले अन्न पौष्टिक असते. हे बर्याच रोगांशी लढण्यास मदत करते.
2. दही आणि मनुका मिड-डे जेवण म्हणून खायला पाहिजे. हे शरीरासाठी फायदेशीर आहे.
3. उन्हाळ्याच्या हंगामात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उसाचा रसाचे सेवन करावे.
4. बरेच लोक तूप खाणे टाळतात. मात्र, सध्याच्या काळात जेवणामध्ये तूप खा. रात्री झोपायच्या आधी पायाच्या तळांवर तूप लावल्यास झोप चांगली येते.
5. जेवणाच्या प्रत्येक पदार्थामध्ये मीठ असते. मात्र, नियमितपणे मीठ खाणे टाळले पाहिजे. अन्नपदार्थांवर वरून मीठ टाकून खाणे टाळा.
6. जास्तीत जास्त डाळींचे सेवन करा, त्यात प्रथिने असतात. रात्री कडधान्य पाण्यात भिजू घाला आणि सकाळी मोड आलेली कडधान्य खा. दर आठवड्यात कमीतकमी 5 प्रकारच्या डाळी खाव्यात.
7. रुजुताच्या मते, बाजरी, ज्वारी याचे दररोज सेवन केले पाहिजे. हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
8. उन्हाळ्याच्या मौसमात उष्णतेपासून दूर राहण्यासाठी घरगुती गुलकंद खावे. यामुळे काही काळ आपले शरीर थंड राहण्यास मदत होते.
9. पाचक तंदुरुस्त राहण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी कढी खाण्याचा प्रयत्न करा कारण यामुळे पोट स्वच्छ राहते आणि त्वचा सुधारते.
टीप : कोणताही उपाय करण्यापूर्वी नेहमीच एखाद्या विशेषज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
संबंधित बातम्या :
Skin care : ऑफिस शिफ्टमध्ये त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी वापरा या टिप्स, चेहरा दिसेल तजेलदार
किवी आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा फायदे https://t.co/cUqNVdKB2R #Kiwi | #HealthCare | #healthtips
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 25, 2021
(Special tips to boost the immune system and stay healthy)