कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा !
कोरड्या त्वचेमुळे अनेकजण त्रस्त आहेत. अनेक उपाय करूनही कोरड्या त्वचेची समस्या अनेकांची दूर होत नाही.
मुंबई : कोरड्या त्वचेमुळे अनेकजण त्रस्त आहेत. अनेक उपाय करूनही कोरड्या त्वचेची समस्या दूर होत नाही. मात्र, आपल्या घरामध्ये असलेल्या काही घटकांच्या आधारे आपण कोरड्या त्वचेची समस्या दूर करू शकतो. दूध लावून चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये त्वचेवर अन्य कोणतेही प्रोडक्ट लावण्याची आवश्यकता नाही. (Special tips to get rid of dry skin problem)
तुमची त्वचा तेलकट असो किंवा कोरडी असो पण आपण जर हा उपाय रात्रीच्या वेळेस करणार असाल तर तेलकट त्वचा असणाऱ्यांनी त्वचेवर गुलाब पाणी आणि त्वचा कोरडी असल्यास आपण नाइट क्रीमचा उपयोग करावा. यामुळे त्वचेला अतिरिक्त पोषण तत्त्वांचा पुरवठा होईल आणि त्वचेतील पेशीही जलदगतीने दुरुस्त होतात. आपल्याला एका वाडीत केळी मॅश करावी लागतील. या केल्याच्या मिश्रणात एक चमचा खोबरेल तेल मिसळून चेहऱ्यावर लावा. कोरडा झाल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
थोडी मसूर डाळ शुद्ध तुपात भाजून घ्या. यानंतर, डाळ दुधात भिजवून घ्या आणि ही डाळ चांगली भिजल्यानंतर त्याची बारीक पेस्ट करून घ्या. ही पेस्ट किमान एक ते दीड तास चेहर्यावर लावा. चेहऱ्यावर फेस पॅक लावलेला असताना, कुणाशीही बोलू नका किंवा हावभाव करू नका. अन्यथा, त्वचा सैल होईल. सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. आपण दररोज हा फेस पॅक वापरू शकत नसाल, तर दोन ते तीन दिवसांनी पुन्हा चेहऱ्यावर प्रयोग करा. हा फेस पॅक रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून पुन्हा वापरू शकता.
हळद अँटीबॅक्टेरीयल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. यातील पोषण तत्त्व कोलेजनचे उत्पादन वाढवतात, ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते. बेसनमध्ये अर्धा चमचा हळद पावडर मिक्स करा. दूध टाकून पेस्ट तयार करा जर तुमच्याकडे गुलाब जल असेल तर या पेस्टमध्ये गुलाब जल मिक्स करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा आणि चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या.
(टीप : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. आपण सौंदर्यतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)
संबंधित बातम्या :
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Special tips to get rid of dry skin problem)