Summer Fashion: उन्हाळ्यातही रहा कूल! हलक्या रंगाचे, ढिल्या कपड्यांचा करा वापर
उन्हापासून (Summer) वाचण्यासाठी कपड्यांची निवड देखील योग्य पद्धतीने करावी लागते. त्यामुळे तुमची कडक उन्हापासून आणि घामापासून सुटका होऊ शकते. या उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये कोणत्या प्रकारच्या आउटफिट्सचा समावेश करू शकता ते जाणून घेऊया.
उन्हाळ्यात, हलक्या रंगाचे आणि आरामदायक पोशाख घालण्यास प्राधान्य दिले जाते. त्यांमुळे शरीराचे तापमान नियंत्रीत राहण्यास मदत होते. याशिवाय उन्हाळ्यातही ट्रेन्डी आणि फॅशनेबल (Trendy and fashionable) कपडे परीधान करून, तुम्ही तुम्ही कुल लुक कॅरी करू शकता. उन्हाळ्यात असे कपडे घालता येतात की त्यामुळे, घामापासूनही आराम मिळतो. उन्हाळ्यात सैल कपडे (Loose clothing in summer) घालावेत. बरेच लोक खूप घट्ट कपडे घालतात, त्यामुळे त्यांना खूप घाम येतो. कारण कापडामुळे त्वचा घट्ट होते. यानंतर, अधिकाधिक घाम येणे सुरू होते. म्हणूनच घट्ट कपडे घालू नयेत. यामुळे केवळ घामच येत नाही तर अंडरआर्मस आणि इतर ठिकाणी त्वचा सोलते. त्यामुळे उन्हाळ्यात कधीही घट्ट कपडे (tight clothes) घालू नका. तसेच या सीझनमध्ये कपड्यांची निवड करतांना कापडाचा प्रकार आणि रंग या दोन गोष्टीकडे अतिशय बारकाईने पाहणे गरजेचे असते. उन्हाळ्यात तुम्ही कोणते कपडे घालावेत असा प्रश्न तुम्हाला असेल तर आम्ही तुम्हाला येथे काही पर्याय सांगणार आहोत.
डेनिम शॉर्ट्स – उन्हाळ्यात तुम्ही जीन्सऐवजी डेनिम शॉर्ट्स घालू शकता. यामुळे तुम्हाला मस्त लुक मिळेल. याच्या मदतीने तुम्ही क्रॉप टॉप किंवा शर्ट विविध स्टाइल करून घालून शकता. डेनिम शॉर्ट्स अत्यंत कॅज्युअल असे आऊटफिट असून, प्रत्येक मुलीच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच डेनिम शॉर्ट्स असायला हवे. डेनिम शॉर्ट्स नेहमी वेगवेगळ्या स्टाईलमध्येही घालता येते. त्यामुळे प्रत्येकवेळी नवा लुक मिळतो.
जंपसूट – जर तुम्ही उन्हाळ्यात बाहेर फिरायला जात असाल तर तुम्ही जंपसूट कॅरी करू शकता. यामध्ये तुम्हाला खूप आरामदायक वाटेल. यामध्ये तुम्हाला अनेक रंग आणि प्रकार उपलब्ध होत असल्याने, एकापेक्षा अधिक पर्याय तुमच्याकडे उपलब्ध होतात. यासोबत तुम्ही स्पोर्ट्स शूज किंवा स्नीकर्स घालू शकता.
मॅक्सी ड्रेस – तुम्ही तुमच्या आवडीनुसार मॅक्सी ड्रेसचे डिझाइन निवडू शकता. तुम्हाला हे अनेक डिझाईन्स आणि रंगांमध्ये मिळतील. या ड्रेसमध्ये तुम्हाला खूप कम्फर्टेबल वाटेल. हे तुम्हाला स्टायलिश लुक देखील देईल. वेगवेगळ्या पॅटनचे सुंदर मॅक्सी कॉटन ड्रेस उन्हाळ्यात बाजारात मिळतात. उन्हाळ्यात घालण्यासाठी हे ड्रेस एकदम परफेक्ट असून, परिधान करणाऱया प्रत्येक स्रीला यात आरामदायी वाटते. हे ड्रेस तुम्ही कधीही वापरू शकता.
प्लाझो आणि कुर्ता – उन्हाळ्यात तुम्ही प्लाझो आणि कुर्ता घालू शकता. यामध्ये तुम्हाला खूप आराम मिळेल. तुम्ही ते कॉटन फॅब्रिकमध्ये घेऊ शकता. हे तुम्हाला स्टायलिश लुक देखील देईल. तुम्ही ते ऑफिस किंवा कॉलेजमध्येही घालू शकता. उन्हाळ्यात लॅगीन्सच्या जागी, प्लाझोचा पर्याय नेहमीच आरामदायी ठरतो. यावर प्रीटेंड, प्लेन कॉटनचा कुर्ता घातल्यावर स्टालीश लुक दिसतो.