नियमित वाफ घेतल्याने चेहऱ्याला काय फायदा होतो? वाचा
क्लींजिंगची एक युक्ती म्हणजे चेहऱ्यावर वाफ घेणे. आपल्याला नेहमी सांगितलं जातं की स्टीम बाथ घ्या. वाफ घ्या! पण या वाफ घेण्याचे फायदे काय आहेत? चेहऱ्यासाठी वाफ का घ्यावी? नेमके काय बदल होतात चेहऱ्यावर याने? नियमित वाफ घेण्याचा नक्कीच खूप फायदा आहे. तुम्हीसुद्धा हे वाचलंत तर नक्कीच रोज वाफ घ्याल. चला तर मग जाणून घेऊया वाफ का घ्यावी? या लेखात आपण जाणून घेणार आहोत की फेस स्टीम म्हणजेच वाफ घेतल्याने ब्लॅकहेड्स खरोखरच दूर होतात की नाही...
मुंबई: चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स असतील तर चेहरा एकदम निस्तेज दिसतो. अशा वेळी तुमचे सौंदर्य कुठेतरी कमी होते. मुली असोत की मुले, प्रत्येकजण ब्लॅकहेड्सच्या समस्येने त्रस्त असतो. हे ब्लॅकहेड्स बरेचदा आपल्या नाकाच्या सभोवतालच्या भागात दिसतात. ब्लॅकहेड्स जेव्हा येतात तेव्हा आपल्या त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण जमा होते आणि तेल जमा होऊ लागते. या तेलामुळे आणि घाणीमुळे चेहऱ्याच्या काही भागावर काळे डाग दिसू लागतात, ज्याला आपण ब्लॅकहेड्स म्हणतो. ते चेहऱ्यावर खूप वाईट दिसतात. अशावेळी चेहऱ्याची नियमित साफसफाई करणं खूप गरजेचं आहे. क्लींजिंगची एक युक्ती म्हणजे चेहऱ्यावर वाफ घेणे. या लेखात आपण जाणून घेणार आहोत की फेस स्टीम म्हणजेच वाफ घेतल्याने ब्लॅकहेड्स खरोखरच दूर होतात की नाही…
रक्ताभिसरण चांगले होते
जर तुमच्या चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स किंवा व्हाइटहेड्स असतील तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा चेहऱ्यावर वाफ घेण्यास सुरुवात करावी. यामुळे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स पूर्णपणे दूर होणार नसले तरी तुम्हाला बऱ्याच अंशी आराम मिळेल. खरं तर वाफ घेतल्याने रक्ताभिसरण चांगले होते तसेच त्वचेची छिद्रे ही उघडतात. हे त्वचेला हायड्रेट देखील करते. चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स काढून टाकण्यासाठी वाफ घेतल्यानंतर त्वचा स्वच्छ करावी. कारण ओलसर त्वचेतून ब्लॅक आणि व्हाइटहेड्स सहज काढून टाकले जातात.
चेहरा कसा स्वच्छ करावा
सर्वप्रथम चेहऱ्यावर वाफ घ्या. त्यानंतर आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार फेसवॉशचा वापर करा. चेहरा स्वच्छ केल्यानंतर ज्या ठिकाणी व्हाइट किंवा ब्लॅकहेड्स आहेत अशा ठिकाणी स्क्रब करा, वर्तुळाकार पद्धतीने मसाज करा. हवं तर स्क्रब केल्यानंतर चेहऱ्यावर ही वाफ घेऊ शकता. यानंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. ब्लॅकहेड्स साफ केल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स सहज दूर होतील.