तणावामुळे या आजारांचा वाढतो धोका, तणावापासून असे राहा दूर

तणाव हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. तणावामुळे इतर अनेक आजारांचा धोका वाढत जातो. त्यामुळे तणावाचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. तणाव येत असेल तर तुम्ही घरीच काही गोष्टी करु शकतात. ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते. जाणून घ्या तणावाची कारणे आणि उपाय काय आहेत.

तणावामुळे या आजारांचा वाढतो धोका, तणावापासून असे राहा दूर
Follow us
| Updated on: Dec 09, 2023 | 4:31 PM

Stress Management : आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम होतो. रोजच्या कामामुळे ताण वाढत जातो, ज्यामुळे आपल्या आरोग्याचे खूप नुकसान होते. तणाव ही एक सामान्य समस्या आहे जी प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला प्रभावित करते. तणावापासून संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण तणावामुळे इतर समस्या ही उद्भवू शकतात. तणाव कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत ते देखील जाणून घेऊयात.

तणावामुळे होणारे आजार

हृदय रोग

तणाव आल्याने हृदयाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. तणावामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तणावामुळे झोप ही लागत नाही. त्यामुळे देखील हृदयावर ताण येऊ शकतो.

मधुमेह

तणाव येतो तसा शरीरात तणावाचे हार्मोन्स तयार होतात. यामुळे इन्सुलिन तयार होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि परिणामी मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

स्ट्रोक

ताण घेतला की उच्च रक्तदाब होऊ शकतो. ज्यामुळे रक्त गोठू शकते किंवा शिरा तुटू शकतात. अशा वेळी मेंदुला व्यवस्थित रक्त पुरवठा झाला नाही तर मग स्ट्रोक येऊ शकतो.

मासिक पाळीवर परिणाम

पिरियड्समुळे शरीरातील हार्मोन्सवर देखील परिणाम होतो. तणावामुळे  मासिक पाळी अनियमित होऊ शकते. यामुळे हार्मोन्समध्ये असंतुलन होऊ शकते.

तणाव कमी करण्यासाठी काय करावे

व्यायाम करा

तणाव येत असेल तर व्यायाम करणे आवश्यक आहे. संपूर्ण शरीराची हालचाल होईल असे व्यायाम करा. यामुळे आनंदी राहता. मूड देखील सुधारतो. दररोज काही वेळ चालण्याची सवय लावा.

चांगला आहार

कोणत्याही आजारात आहार खूप महत्त्वाचा फॅक्टर असतो. त्यामुळे आहारात सगळ्या गोष्टींचा समावेश करा. ज्यामध्ये भाज्या, फळे, दूध यांचा समावेश होतो.

मेडिटेशन करा

दररोज मेडिटेशन करणे फार महत्त्वाचे ठरते. तुम्ही जर तुमच्या वेळेनुसार दररोज काही वेळ जरी ध्यान केला तरी तुम्हाला तणावापासून मुक्ती मिळू शकते

जास्त काळ मोबाईल वापरणे टाळा

मोबाईलमुळे देखील तणाव वाढू शकतो. सोशल मीडियावर वेळ घालवू नका. त्याऐवजी चांगली झोप घ्या. गरजेपुरताच मोबाईलचा वापर करा.

चांगली झोप महत्त्वाची

झोपे ही तणावाच्या रुग्णांसाठी खूप महत्त्वाची असते. झोप चांगली झाली तर ताण येत नाही. यामुळे स्ट्रेस हर्मोन्स कमी होतात. दररोज ८ ते ९ तासांची झोप घ्या. झोपण्याची वेळ आणि उठण्याची वेळ निश्चित करुन घ्या.

मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.