गुडघ्यांवरील काळपटपणामुळे त्रस्त आहात, मग ‘हे’ उपाय करा !

आपली त्वचा, केस सुंदर दिसावेत यासाठी अनेक महिला सौंदर्य प्रसाधने, आयुर्वेदिक उपाय किंवा घरगुती उपाय करत असतात.

गुडघ्यांवरील काळपटपणामुळे त्रस्त आहात, मग ‘हे’ उपाय करा !
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 11:21 AM

मुंबई : आपली त्वचा, केस सुंदर दिसावेत यासाठी अनेक महिला सौंदर्य प्रसाधने, आयुर्वेदिक उपाय किंवा घरगुती उपाय करत असतात. आपण कायम केस आणि चेहरा यांच्या सौंदर्याकडे प्रामुख्याने लक्ष देतो. पण तुलनेने हाता-पायांच्या त्वचेकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे त्वचा रुक्ष होणं, पायांच्या टाचांना भेगा पडणे, गुडघे काळे होणे यासारख्या अनेक समस्या निर्माण होतात. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी गुडघ्यांचा काळपटपणा कसा दूर करायचा हे सांगणार आहोत. (suffering from darkness on the knees try these tips to remove)

-कोरफडीचा रस 20 मिनिटे गुडघ्यांवर लावून ठेवावा. त्यानंतर कोमट पाण्याने पाय धुवावेत. असे तुम्ही आठवड्यातून किमान दोनदा तरी केले पाहिजे. त्यानंतर काही दिवसांमध्ये तुम्हाला गुडघ्यांवरील काळपटपणा दूर झालेला दिसेल

-तुम्हाला माहिती आहे की, लिंबाचा रस हा अत्यंत आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे. लिंबाचा रस गुडघ्यांवर लावा आणि जवळपास 1 तास तो तसाच ठेवा. एक तास झाल्यानंतर पाय स्वच्छ धुवून टाका. दररोज हा उपाय केल्यास गुडघ्यांचा काळपटपणा दूर होईल.

-एक चमचा बेकिंग सोडा घेऊन त्यात थोडंसं दूध मिक्स करावं. त्यानंतर हे मिश्रण पायाला लावून स्क्रब करावं. स्क्रब झाल्यानंतर थोडा वेळ तसेच ठेवा आणि नंतर पाण्याने पाय धुवून टाका.

-खोबरेल तेलामुळे त्वचा हायड्रेट होते. त्यासोबतच त्वचेतील ओलावा टिकून राहतो. त्यामुळे खोबरेल तेल शरीरासाठी फायदेशीर ठरतं. तसंच गुडघ्यांचा काळपटपणा दूर करायचा असेल तर खोबरेल तेल थेट लावण्यापेक्षा त्यात अक्रोडची पावडर मिक्स करावी.

-दोन चमचे ऑलिव्ह ऑइल आणि दोन चमचे साखर एकत्र करुन हे मिश्रण गुडघ्यांवर लावावं. त्यानंतर थोडावेळ त्याने स्क्रब करावं. पाच मिनिटे ही पेस्ट अशीच गुडघ्यांवर ठेवून नंतर धुवून टाकावी.

संबंधित बातम्या : 

(suffering from darkness on the knees try these tips to remove)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.