नाक बंद झाल्यामुळे त्रास होतोय? मग हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
एखाद्याला सर्दी झाली तर नाक बंद झाल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. श्वास घेण्यास देखील अडथळा निर्माण होतो. थंडीमुळे नाकातील उतींची सूज वाढते. यापासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय खूप फायदेशीर ठरतात.
![नाक बंद झाल्यामुळे त्रास होतोय? मग हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर नाक बंद झाल्यामुळे त्रास होतोय? मग हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/nasal-congestion.jpg?w=1280)
हिवाळ्यात सर्दी ही सर्वात सामान्य समस्या आहे. परंतु सर्वात मोठी समस्या नाक बंद झाल्यामुळे निर्माण होते. नाक बंद झाले तर श्वास घेणे ही कठीण होते. पडून राहिल्यावर ही समस्या अधिकच वाढते. सर्दी झाली की कफ जमा होतो याशिवाय नाकाच्या उतींना सूज येते त्यामुळे नाक बंद होते. कोरड्या वाऱ्यामुळे हा त्रास आणखीन वाढतो नाक बंद होण्यासाठी घरगुती उपाय खूप प्रभावी आहेत.
नाक बंद झाल्यामुळे कोणतेही काम करणे अगदी बसून किंवा पडून राहणे देखील कठीण होते. सर्दी पासून सुटका मिळवण्यासाठी लोक औषधही घेतात पण लगेच आराम मिळणे कठीण असते. आज-काल बंद असलेले नाक साफ करणारे स्प्रे देखील बाजारात येऊ लागलेत. परंतु बऱ्याच लोकांना असे वाटते की ते सवयी सारखे बनतात. जाणून घेऊ बंद झालेले नाक उघडण्याच्या काही सोप्या टिप्स.
ओव्याची पोटली
जर तुमचे नाक बंद झाले असेल तर ते उघडण्यासाठी ओवा खूप फायदेशीर ठरेल. एक ते दीड चमचा ओवा घेऊन तव्यावर भाजून गरम करून घ्या आणि थोडा गरम असतानाच एका मऊ सुती कपड्यात बांधून त्याची एक पोटली बनवा. याचा वास घेतल्याने बंद झालेले नाक मोकळे होण्यास मदत होते. हा उपाय लहान मुलांसाठीही फायदेशीर आहे.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Veer-Pahariya-with-mother.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Punha-Kartavya-Ahe-serial.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Saif-Ali-Khan-and-Kareena-Kapoor-1.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Prajakta-Mali-in-Bengaluru-ashram-7-1.jpg)
पाण्यात ही गोष्ट टाकून घ्या वाफ
वाफ घेणे हा प्रौढांसाठी तसेच लहान मुलांसाठी नाक बंद झाल्यास आराम मिळवण्याचा उत्तम मार्ग आहे. तुम्ही गरम पाण्यात लवंगाचे तेल टाकू शकता किंवा 6 ते 8 लवंगा बारीक करून पाण्यात टाकू शकता आणि नंतर त्याची वाफ घ्या.
मोहरीचे तेल
लहान मुलांचे नाक बंद झाल्यास आई आजीच्या काळातील जुना उपाय म्हणजे नाकात मोहरीचे तेल एक ते दोन थेंब टाकून काही वेळ झोपावे. त्यामुळे बंद झालेले नाक मोकळे होण्यास मदत होते.
दिवसातून दोन ते तीन वेळा प्या काढा
सर्दीपासून आराम मिळवण्यासाठी सहा सात तुळशीची पाने, दोन तीन लवंगा, अर्धा इंच आल्याचा तुकडा तीन ते चार काळीमिरी पाण्यात चांगले उकळून घ्या. हे पिल्याने सर्दी आणि घसा दुखी पासून आराम मिळेल आणि कफ देखील कमी होईल.