उन्हाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा ‘या’ गोष्टी!
चेहऱ्यावर काही गोष्टी लावल्याने तुमची त्वचा निस्तेज आणि निर्जीव सुद्धा बनते. चला तर मग उन्हाळ्यात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर कोणत्या गोष्टी लावाव्यात हे आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत.
मुंबई: उन्हाळा जसजसा जवळ येतो तसतसे त्वचेशी संबंधित अनेक समस्या येऊ लागतात. या समस्यांवर मात करण्यासाठी अनेक जण विविध प्रकारची उत्पादने देखील वापरतात. पण एवढं सगळं करूनही तुमच्या त्वचेला काहीच फायदा होत नाही. चेहऱ्यावर काही गोष्टी लावल्याने तुमची त्वचा निस्तेज आणि निर्जीव सुद्धा बनते. चला तर मग उन्हाळ्यात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर कोणत्या गोष्टी लावाव्यात हे आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत.
उन्हाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा ‘या’ गोष्टी
बदामतेल
बदामाचे तेल त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे उन्हाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाने चेहऱ्यावर मसाज करा. असे केल्याने त्वचा दुरुस्त होते आणि चेहरा चमकदार होतो. त्याचबरोबर बदामाचे तेल आपल्या त्वचेचे सूर्याच्या किरणांपासून संरक्षण करते आणि डागदेखील दूर करते.
कोरफड जेल
कोरफड जेल त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. होय, रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर कोरफड जेल लावल्यास त्वचेवर टॅनिंगची समस्या दूर होते आणि त्वचाही मुलायम होते. असे केल्याने पिंपल्सची समस्या दूर होते आणि त्वचाही सुधारते.
दही
दही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्याचबरोबर त्वचेसाठीही फायदेशीर आहे, कारण दह्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीनसोबत व्हिटॅमिन डी देखील आढळते. ज्यामुळे त्वचा चमकदार होते आणि चेहऱ्याचा काळेपणा दूर होतो. ते लावण्यासाठी एका बाऊलमध्ये दही घ्या चेहऱ्यावर 5 मिनिटे मसाज करा. यानंतर रात्रभर चेहऱ्यावर ठेवून सकाळी उठून स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)