उन्हाळ्यात त्वचेच्या काळजीसाठी सर्वोत्तम आहेत ‘हे’ कोरफड जेल फेस मास्क, जाणून घ्या
जसजसा उन्हाळ्यात उष्णता वाढत जाते तसतसे त्वचेशी संबंधित समस्या जसे की मुरुमे, त्वचेवर सूज येणे, लालसरपणा, पुरळ येणे इत्यादी उद्भवू लागतात. या लेखात, आपण 4 कोरफडीच्या मास्कबद्दल जाणून घेऊ जे त्वचेला हायड्रेट करतील आणि उन्हाळ्यातील त्वचेच्या समस्यांपासून मुक्तता मिळेल.

उन्हाळा सुरू झाला की आपण आरोग्यासह त्वचेची काळजी घेण्यास सुरूवात करतो. कारण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडते त्यामुळे त्वचेसंबंधीत अनेक समस्या निर्माण होतात. यासाठी स्किन केअर करताना अनेकजण कोरफड जेलचा वापर करतात कारण कोरफड हा असाच एक घटक आहे जो उन्हाळा असो वा हिवाळा, त्वचेला पोषण देण्यापासून ते चमक टिकवून ठेवण्यास मदत करतो. हिवाळ्यात ते त्वचेला हायड्रेट करते आणि कोरडेपणा कमी करते, तर उन्हाळ्यात ते त्वचेची जळजळ कमी करते आणि लालसरपणा, सूज, खाज सुटणे यासारख्या समस्यांपासून आराम देण्यासाठी उत्कृष्ट आहे. कोरफडीमध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात आणि ते सहज उपलब्ध देखील असते. अशातच कोरफड जेलही त्वचेसाठी एक उत्तम नैसर्गिक घटक आहे.
कोरफडीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात जे उन्हाळ्यात त्वचेला बॅक्टेरियाच्या संसर्गापासून वाचवतात. याशिवाय, त्याचे थंड गुणधर्म त्वचेला उष्णतेपासून आराम देतात. ज्यामुळे चेहरा फ्रेश दिसतो. तर आजच्या या लेखात आपण 4 कोरफड जेलच्या मास्कबद्दल जाणून घेऊया जे उन्हाळ्यात तुमचा चेहरा नैसर्गिकरित्या चमकदार आणि मऊ राहील.
कोरफड आणि ग्रीन टी मास्क
ग्रीन टी आणि कोरफड दोन्ही त्वचेला हायड्रेट करण्यासाठी व मुरुमांपासून मुक्त होण्यासाठी त्याचबरोबर संसर्ग होऊ नये म्हणून त्वचेला थंडावा देण्यासाठी आणि डागांपासून मुक्तता मिळावी या करिता उत्कृष्ट आहेत. दोन चमचे कोरफड जेलमध्ये समान प्रमाणात ग्रीन टी पावडर मिसळा आणि चेहऱ्यापासून मानेपर्यंत तयार फेस मास्क लावा. 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.
या फेस मास्कमुळे टॅनिंग दूर होईल
कोरफडीच्या जेलमध्ये मध आणि चिमूटभर हळद मिसळून फेस मास्क तयार करा. हे लावल्याने टॅनिंग निघून जाते आणि हळूहळू डाग आणि पिगमेंटेशन देखील कमी होऊ लागते. यामुळे त्वचा मऊ होते आणि सूज देखील कमी होते.
हा फेस मास्क तुमचा चेहरा उजळवेल
कोरफडीच्या जेलमध्ये गुलाबजल मिसळा आणि त्यात व्हिटॅमिन ईचा कॅप्सूल मिक्स करा. आता हा फेस मास्क केवळ मुरुमांपासून, त्वचेच्या कोरडेपणापासून मुक्त होण्यास मदत करत नाही तर रंग सुधारतो, त्वचा घट्ट करतो आणि टॅनिंग कमी करतो.
त्वचा खोलवर हायड्रेटेड राहील
कोरफडचे जेल त्वचेसाठी फायदेशीर आहे, त्याशिवाय काकडी सुद्धा त्वचेला हायड्रेट करण्याचे काम देखील करते. तेलकट त्वचा असलेल्यांसाठी हा एक चांगला फेस मास्क आहे. काकडीचा रस कोरफडीच्या जेलमध्ये मिसळा. त्यात चिमूटभर हळद मिक्स करून त्वचेवर लावा. यामुळे त्वचा फ्रेश दिसेल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)