AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात मडक्यातील पाणी फायदेशीर, परंतु ‘ही’ काळजी घेणे आवश्यक

आयुर्वेदानुसार मडक्यातील पाणी पिणं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे पाणी पचनक्रिया सुधारतं, शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकायला मदत करतं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतं. उन्हाळ्यात फ्रिजमधील अतिथंड पाणी प्यायल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याऐवजी, मडक्यातील थंडसर आणि नैसर्गिक पाणी पिणं हा आरोग्यदायी पर्याय आहे. योग्य काळजी घेतली तर मडक्यातील पाणी दीर्घकाळ सुरक्षित राहू शकतं.

उन्हाळ्यात मडक्यातील पाणी फायदेशीर, परंतु 'ही' काळजी घेणे आवश्यक
clay pot
Follow us
| Updated on: Mar 31, 2025 | 8:04 PM

उन्हाळ्यात थंड पाणी पिण्याची मजा काही वेगळीच असते. त्यासाठी फ्रिजमध्ये पाणी ठेवणं हे एक सामान्य प्रचलन बनलं आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का की फ्रिजमधलं थंड पाणी तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं? याऐवजी, मडक्याचं पाणी पिणं हे अधिक सुरक्षित आणि फायदेशीर असू शकतं.

मडके किंवा मातीपासून बनवलेली बाटल्या तुमचं पाणी नैसर्गिकपणे थंड ठेवतात आणि आरोग्यदायक असतात. तरी, याचा वापर करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे, अन्यथा त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर नकारात्मक होऊ शकतो.

1. मडक्याची स्वच्छता

मडक्याचा वापर करण्यापूर्वी त्याची पूर्ण स्वच्छता करणं आवश्यक आहे. मातीपासून बनलेल्या मडक्यात जिवाणू आणि घाण साठू शकतात, ज्यामुळे पाणी खराब होऊ शकतं. मडक्याच्या आत कोणताही वास किंवा घाण नसेल याची खात्री करा आणि ते नीट धुवा. नवीन मडकं विकत घेत असाल, तर ते देखील चांगल्या प्रकारे धुवा. यासाठी गरम पाणी आणि बेकिंग सोड्याचं मिश्रण वापरलं जाऊ शकतं, ज्यामुळे मडक्याच्या आतली स्वच्छता चांगली होईल.

2. जागेची निवड

मडकं ठेवताना ते अशा जागी ठेवा जिथे ते सूर्यप्रकाशापासून वाचेल. तीव्र सूर्यप्रकाशात ठेवलेलं मडकं लवकर गरम होतं, ज्यामुळे पाण्याची चव बिघडू शकते आणि पाणी कमी थंड राहिलं. शिवाय, मडकं लवकर तडकण्याची शक्यता देखील असते. ते थंड आणि हवेशीर जागी ठेवणं जास्त चांगलं असतं.

3. मडक्याची देखभाल

मडक्याची देखभाल महत्त्वपूर्ण आहे. वेळोवेळी मडक्याची स्वच्छता करा आणि त्यामध्ये कुठे भेग किंवा तडा गेलेला नाही याची तपासणी करा. जर मडकं तुटलं किंवा भेग पडली, तर त्याचा वापर करू नका. यामुळे पाणी बाहेर पडू शकतं किंवा पाण्यात जिवाणूंचा संसर्ग होऊ शकतो.

4. पाणी बदलत राहा

मडक्यात पाणी जास्त काळ ठेवल्याने त्यात जिवाणू होऊ शकतात, त्यामुळे मडक्यातलं पाणी वेळोवेळी बदलत राहणं आवश्यक आहे. जर तुम्ही मडक्याचा वापर करत असाल, तर दररोज किंवा एक दिवसाआड त्यात नवीन पाणी भरा.

मडक्यातील पाणी पिण्याचे ४ फायदे

  1. थंड पाणी प्यायल्याने पचनक्रियेत अडथळा येऊ शकतो. पण मडक्यातील हलकं थंड पाणी पचनासाठी उपयुक्त असतं.
  2. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढते. मडक्यातील पाणी शरीरातील उष्णता कमी करून तुम्हाला थंड ठेवण्यास मदत करतं.
  3. प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये असलेले रासायनिक घटक हाडांसाठी हानिकारक ठरू शकतात, तर मडक्यातील पाणी नैसर्गिक आणि सुरक्षित असतं.
  4. फ्रिजमधील थंड पाणी प्यायल्याने सर्दी होण्याची शक्यता असते. पण मडक्यातील पाणी शरीरासाठी चांगलं आणि आरोग्यदायी असतं.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू.
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी.
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय.
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं..
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्....
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय...
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय....
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी.