Kurmure: कुरमुरे खाण्याचे 7 मोठे फायदे, जे खूप कमी लोकांना माहितीये
कुरमुरे खाण्यासाठी अनेकांना आवडतात. कोणी त्याची भेळ करुन खातात तर कोणी लाडू. पण तुम्हाला माहितीये का या कुरमुऱ्यात अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे असतात. त्यामुळे आज आपण कुरमुरे खाण्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया.
Benefits of Kurmure : भेळपुरी, पोहे इत्यादी सारखे तांदळापासून बनवलेले पदार्थ अनेकांना आवडतात. कुरमुरे हे खायला स्वादिष्ट लागतात. पण तुम्हाला याचे फायदे माहित आहेत का? कुरमुरे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया कुरमुरे खाण्याचे फायदे काय आहेत.
1. बद्धकोष्ठतेपासून आराम
कुरमुरे पचायला सोपे असतात. याशिवाय यामध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे पचनशक्ती मजबूत होते आणि बद्धकोष्ठता आणि लठ्ठपणाच्या समस्येपासून आराम मिळतो.
2. हाडे मजबूत करते
कुरमुरे खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. संशोधनानुसार, कुरमुऱ्यात कॅल्शियम आणि पोटॅशियम हे घटक पुरेसे प्रमाणात असतात. जे हाडे निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी महत्त्वाचे असतात.
3. ऊर्जा वाढवते
कुरमुऱ्यात मुबलक प्रमाणात कार्बोहायड्रेट्स देखील असतात, जे शरीराच्या उर्जेची 60-70 टक्के गरज पूर्ण करतात.
4. वजन नियंत्रित ठेवण्यास मदत
लठ्ठपणा जर कमी करायचा असेल तर कमी कॅलरीयुक्त अन्न खा. कुरमुऱ्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी कुरमुरे फायदेशीर ठरेल.
5. खनिजे आणि जीवनसत्त्वे
कुरमुरे पासून लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक, कॅल्शियम इत्यादी अनेक खनिजे मिळतात. याशिवाय व्हिटॅमिन बी, थायामिन, रिबोफ्लेविन, नियासिन आणि पॅन्टोथेनिक अॅसिड देखील यामध्ये असते, जे तुमचे शरीर निरोगी बनवते.
6. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते
ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे त्यांनी आहारात कुरमुऱ्याचा समावेश करावा. कारण कुरमुरे रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकता. कुरमुऱ्यात भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायटोकेमिकल्स असतात. जे रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात.
7. त्वचेच्या समस्या होतील दूर
कुरमुरे आरोग्यासाठी चांगले असतात. तसेच ते त्वचेसाठीगी फायदेशीर आहे. त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी ही कुरमुरे मदत करतात. संशोधनानुसार कुरमुरे खाल्ल्याने त्यापासून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी मिळते. हे जीवनसत्व त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे.