केसांची घ्या या पद्धतीने काळजी, केस होतील दाट आणि चमकदार

अनेक वेळा आपल्याकडून केसांची काळजी घेतली जात नाही. यामुळे केस कमकुवत होतात आणि नंतर केस गळण्याची समस्या निर्माण होते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला तज्ञांनी केसांची काळजी घेण्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत. ज्यामुळे तुम्हाला केसांची काळजी घेणे सोपे होईल.

केसांची घ्या या पद्धतीने काळजी, केस होतील दाट आणि चमकदार
hair longImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 04, 2025 | 1:50 PM

नवीन वर्ष सुरू झाला आहे. नवीन वर्षात अनेक जण नवीन संकल्प करत असतात. काहीजण फिटनेसचा संकल्प करतात तर काही आरोग्याशी संबंधित करतात. पण अनेकदा केसांकडे मात्र दुर्लक्ष केल्या जाते. हिवाळा हा केसांसाठी आव्हानात्मक असतो. त्यामुळे केसांचे सौंदर्य आणि चमक वाढवण्यासाठी त्याची काळजी कशी घ्यायची याबाबत अनेक लोकांमध्ये संभ्रम असतो.

श्री बालाजी ॲक्शन मेडिकल इन्स्टिट्यूट दिल्ली येथील डॉ. विजय सिंघल यांच्या म्हणण्यानुसार केसांवर संपूर्ण सौंदर्य अवलंबून असते. जर तुम्ही केसांची योग्य काळजी घेतली नाही तर केस गळणे किंवा कोंडा होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. या नवीन वर्षात तुम्ही तुमचे केस निरोगी आणि सुंदर बनवण्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करू शकतात. केसांची योग्य निगा राखण्यासाठी जाणून घेऊया तज्ञांकडून काही सोप्या टिप्स.

आहाराकडे लक्ष द्या

तुमचे केस निरोगी आणि सुंदर बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी प्रथिने, लोह, खनिजे आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर असलेल्या गोष्टी खाव्यात. तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, सुकामेवा आणि माशांचा समावेश करू शकतात.

शरीर हायड्रेट ठेवा

जर तुम्हाला तुमच्या केसांचे आरोग्य चांगले हवे असेल तर तुमचे शरीर हायड्रेट ठेवा. हे केसांसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे दिवसभरात किमान तुम्ही आठ ते दहा ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.

मालिश करा

तुमच्या केसांच्या मुलांमध्ये रक्ताभिसरण आणि पोषण चांगले राहण्यासाठी तुम्ही आठवड्यातून किमान तीन वेळा नारळ, बदाम किंवा मोहरीच्या तेलाने मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण तर सुधारतेच पण केसांची मुळे देखील मजबूत होतात.

रासायनिक उत्पादने वापरणे टाळा

आजकाल केसांसाठी बाजारात अनेक प्रकारचे रासायनिक उत्पादने उपलब्ध आहे. त्याच्या वापरामुळे केसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यासाठी डॉक्टरांच्या सल्ला शिवाय त्याचा वापर करू नका फक्त नैसर्गिक आणि सेंद्रिय उत्पादने वापरण्याचा प्रयत्न करा.

तणाव कमी करा

जर तुम्ही कोणत्याही कारणाने जास्त ताण घेत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या केसांच्या आरोग्यावर देखील होतो. त्यामुळे ध्यान आणि योगाद्वारे तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.

केस धुण्याची आणि वाढवण्याची योग्य पद्धत समजून घ्या

तुम्ही तुमचे केस कसे धुता आणि त्याची काळजी कशी घेता याचा केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे केस जास्त गरम पाण्याने धुणे टाळा. केस पूर्णपणे सुकल्या नंतरच केसांना तेल लावा. याशिवाय बाहेर सूर्यप्रकाश आणि धुळीपासून देखील केसांचे संरक्षण करा.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.