दिवसभरातून किती कप चहा प्यायला पाहिजे?

चहावर प्रेम करणारे बहुतेक लोक याची काळजी घेत नाहीत की त्याचे जास्त सेवन केल्याने आरोग्याचे मोठे नुकसान होऊ शकते. अशावेळी हा चहा पिण्याची मर्यादा काय आहे, हे जाणून घेणं गरजेचं आहे.

दिवसभरातून किती कप चहा प्यायला पाहिजे?
how many cup of tea in a dayImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 5:05 PM

भारतातच नाही तर जगभरात चहाप्रेमी आपल्याला सापडतील, आपल्यापैकी अनेक जण असे आहेत ज्यांना सकाळी चहा पिण्याची सवय आहे. या लोकांची दिवसभरात अनेक कप चहा प्यायलाही हरकत नसते. ऑफिसमध्ये चहा पिण्याबद्दल विचारलं तर ‘नाही’ म्हणावंसं वाटत नाही. मात्र, चहावर प्रेम करणारे बहुतेक लोक याची काळजी घेत नाहीत की त्याचे जास्त सेवन केल्याने आरोग्याचे मोठे नुकसान होऊ शकते. अशावेळी हा चहा पिण्याची मर्यादा काय आहे, हे जाणून घेणं गरजेचं आहे.

चहामध्ये कॅफिन आणि साखर असते, हे दोन्ही आरोग्यासाठी चांगले मानले जात नाहीत. जर तुम्ही दिवसातून 5 ते 10 कप चहा पित असाल तर कुठेतरी तुम्ही स्वत:चं नुकसान करत आहात, त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

चहा प्यायल्याने नुकसान होते असे नाही, हे पेय शतकानुशतके पारंपारिक औषधांमध्ये वापरले जात आहे, हे आपल्याला ताजेतवाने करण्यास आणि तणाव दूर करण्यास मदत करते, परंतु जर आपण एका मर्यादेपेक्षा जास्त चहा पिला तर बद्धकोष्ठता, छातीत जळजळ, आतड्यांवर वाईट परिणाम, आम्लपित्त, उच्च रक्तदाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

भारतात चहामध्ये साखर मिसळण्याचा ट्रेंड खूप जास्त आहे आणि दिवसभरात अनेक कप चहा प्यायल्यास साखरेचे सेवन वाढणार हे उघड आहे. अशावेळी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढेल आणि मग मधुमेहाचा धोका निर्माण होऊ शकतो.

आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित आहे की जास्त साखर खाल्ल्याने साखरेचे चरबीमध्ये रूपांतर होऊ लागते, ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि मग पोटाभोवती चरबी येते. अशा वेळी वजन कमी करणे अवघड होऊन बसते.

चहामध्ये कॅफिन भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे ताजेपणा मिळतो, पण तुम्हाला पुन्हा चहाचे व्यसन लागते आणि ज्या दिवशी तुम्ही या पेयाचे सेवन केले नाही, त्या दिवशी तुम्हाला अस्वस्थता आणि डोकेदुखीला सामोरे जावे लागू शकते. चहामुळे झोपही निघून जाते, त्यामुळे तुमच्या झोपण्याच्या पद्धतीवर वाईट परिणाम होऊ शकतो.

दिवसभरात किती कप चहा प्यावा, असा प्रश्नही तुमच्या मनात निर्माण होत असेल तर तुम्ही दररोज 2-3 कप चहा पिऊ शकता, तेही मर्यादित प्रमाणात साखरेने. ज्यांना या सवयीवर नियंत्रण ठेवता येत नाही त्यांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.