तज्ज्ञांकडून जाणून घ्या, हिवाळ्यात ‘हे’ 3 मसाले शरीराला ठेवतील उबदार

आपल्या स्वयंपाकघरात असे काही मसाले आहेत. ज्याच्या सेवनाने तुमचे शरीर आतून उबदार राहण्यास मदत करतात. थंडीमध्ये खास करून या मसाल्यांच्या वापर करू शकता. यांच्या सेवनाने थंडीत तुमचे शरीर निरोगी राहते.

तज्ज्ञांकडून जाणून घ्या, हिवाळ्यात 'हे' 3 मसाले शरीराला ठेवतील उबदार
Follow us
| Updated on: Nov 22, 2024 | 3:59 PM

हिवाळा ऋतू सुरु झाला असून हवेतील गारवा देखील वाढत चाललेला आहे. यासाठी आपण प्रत्येकजण थंडी पासून बचाव करण्याकरिता स्वेटर तसेच शरीराला उबदार ठेवण्यासाठी गरम कपडे घालत असतो. पण या बरोबर हे ही लक्षात ठेवा कि शरीराला आतून उबदार ठेवणंही गरजेचं आहे. यासाठी तुमच्या आहारात सूप, हिरव्या भाज्या आणि मसाल्यांचा समावेश करा. आहारात समावेश केल्याने शरीर उबदार तसेच निरोगी राहते. आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक छोटे मसाले असतात, जे आपले शरीर आतून उबदार ठेवण्याचे काम करतात.

न्यूट्रिशनिस्ट नमामि अग्रवाल सांगतात की, मसाल्यांमध्ये अनेक व्हिटॅमिन्स असतात. त्यांचा योग्य वापर व्हायला हवा. त्यांचा वापर मर्यादित प्रमाणात केल्यास ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. याच नुसार आम्ही तुम्हाला अशा मसाल्यांबद्दल सांगणार आहोत, जे तुमचे शरीर आतून उबदार ठेवतील.

जायफळ

स्वयंपाकघरात जेवाण बनवताना अनेक पदार्थांमध्ये जायफळ वापरला जातो. मसाल्यांमध्ये जायफळ गरम असतो. अशातच तुम्ही सुद्धा थंडीच्या दिवसांमध्ये स्वयंपाक बनवताना काही पदार्थांमध्ये जायफळ वापरून शरीराला आतून उबदार ठेवण्यासाठी वापर करता येतो. यामुळे मन शांत राहते तसेच पचनशक्ती ही मजबूत होते. गोड आणि चमचमीत अशा दोन्ही पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो.

हे सुद्धा वाचा

कसे वापर कराल

तुम्ही जायफळ पावडर एक ग्लास कोमट दुधात घालून देखील सेवन करू शकता. तसेच सूपमध्ये जायफळ पूड घालून त्याची चव वाढवता येते. यामुळे पोट भरण्याबरोबरच पचनक्रिया देखील सुधारते.

हिंग

आपल्या स्वयंपाकघरात हिंगाचा सर्वाधिक वापर केला जातो. हिंग हे अतिशय गुणकारी असून शरीराला आतून उबदार ठेवते. हे चयापचय वाढविण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी ओळखले जाते.

असा समावेश करा

जेवण बनवताना तुम्ही जेव्हा डाळ आणि कढी तडक देण्यापूर्वी गरम तेलात चिमूटभर हिंग घाला आणि मग तडक द्या. तसेच तुम्ही जर उकळत्या पाण्यात आले आणि काळी मिरी सोबत चिमूटभर हिंग मिसळा. याचा चहा प्यायल्याने आरोग्याला खूप फायदा होईल.

चक्री फूल

ग्राम मसाला बनवताना चक्री फुलाचा देखील वापर केला जातो. या चक्री फुलाला हलकी गोड चव असते. अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले हे चक्री फुलाचे आहारात समावेश केल्याने शरीर आतून उबदार राहते. याचे सेवन थंड हवामानात खूप फायदेशीर असतात.

आहारात समावेश कसा करावा

स्वयंपाक घरात मसाले भात तसेच बिर्याणी बनवताना चक्री फुल वापरू शकता. याने जेवणाची चव वाढते त्याचबरोबर यातील अँटिऑक्सिडंट्स शरीरात ऊर्जा निर्माण करते. याशिवाय तुम्हाला जर मसालेदार चहा प्याची सवय असल्यास चहाच्या मसाल्यातही चक्री फूल घालू शकता.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.