मानेवरील पिग्मेंटेशनपासून सुटका हवी? ‘हे’ 7 घरगुती उपाय वापरा
तुमच्या मानेचा रंग बदलला आहे का? तुम्ही कधी पाहिलं आहे का की, जास्त उन्हाच्या संपर्कात आल्यामुळे आपल्या मानेचा रंग थोडा गडद होतो. खरं तर जेव्हा आपण उन्हात जातो तेव्हा सूर्याचा तेजस्वी प्रकाश टाळण्यासाठी आपली त्वचा मेलेनिनचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे त्वचेवर पिग्मेंटेशन म्हणजेच काळे डाग दिसू लागते. यापासून सुटका मिळवण्यासाठी 7 घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहोत. जाणून घेऊया.
तुम्ही घराबाहेर सूर्यप्रकाशात गेले की तुमच्या मानेचा रंग बदलतो का? टॅनिंग हा हायपरपिग्मेंटेशनचा एक प्रकार आहे. हा सहसा सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांच्या संपर्कात आल्याने होतो. आपण उन्हात बाहेर पडतो तेव्हा सूर्याच्या या किरणांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपली त्वचा मेलेनिन तयार करते, परंतु टॅनिंगमध्ये मेलेनिनचे उत्पादन असामान्यपणे वाढते, ज्यामुळे त्वचेवर काळे किंवा तपकिरी डाग दिसतात.
हे डाग शरीराच्या कोणत्याही भागावर उद्भवू शकतात, त्यापैकी काही कपड्यांद्वारे लपवले जाऊ शकतात, परंतु काही जसे की चेहरा किंवा मानेवरील पिग्मेंटेशन स्पष्टपणे दिसून येते. लक्षात घ्या की. त्वचेवर काळे डाग दिसतात. यालाच पिग्मेंटेशन असे म्हणतात.
मानेवरील पिग्मेंटेशन सहसा सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात, हार्मोनल असंतुलनामुळे किंवा त्वचेची योग्य काळजी न घेतल्यामुळे होते. पिग्मेंटेशन पूर्णपणे काढून टाकणे कठीण असले तरी नियमित काळजी आणि काही घरगुती उपचारांच्या मदतीने ते वाढण्यापासून रोखले जाऊ शकते. चला जाणून घेऊया अशाच 7 घरगुती उपायांबद्दल.
1) लिंबू आणि मध
लिंबाच्या रसात मध मिसळून मानेवर लावा. लिंबाचा रस त्वचा स्वच्छ करतो आणि मध तिला मॉइश्चरायझ करतो. 10-15 मिनिटांनी धुवून टाका. या मिश्रणामुळे त्वचेची टॅनिंग हलकी होते.
2) टोमॅटोचा रस
टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते, जे त्वचेला नवसंजीवनी देण्यास मदत करते. टोमॅटोचा रस मानेवर लावा आणि 15 मिनिटांनी धुवून टाका. यामुळे टॅनिंग कमी होते.
3) बेसन दही आणि हळद
दह्यात हळद, बेसन मिसळून पेस्ट तयार करून मानेवर लावा. दही त्वचा मऊ करते आणि हळद त्वचेचा टोन वाढवते. 20 मिनिटांनी नॉर्मल पाण्याने धुवून टाका.
4) संत्र्याच्या सालीची पेस्ट
संत्र्याची साल वाळवून पावडर बनवा. त्यात थोडे गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करून मानेवर लावा. यामुळे टॅनिंग कमी होऊन त्वचेला नवसंजीवनी मिळण्यास मदत होईल.
5) काकडीचा रस
काकडीच्या रसामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. काकडीच्या रसात थोडा लिंबाचा रस मिसळून मानेवर लावा आणि 15 मिनिटांनी नॉर्मल पाण्याने धुवून टाका.
6) बटाट्याची पेस्ट
बटाटा किसून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट मानेवर लावा. बटाट्यामध्ये त्वचेचा रंग वाढवणारे गुणधर्म असतात. 15-20 मिनिटांनी नॉर्मल पाण्याने धुवून टाका.
7) संत्र्याचा रस आणि साखर
संत्र्याच्या रसात थोडी साखर घालून मानेवर स्क्रब म्हणून लावा. साखर मृत त्वचा काढून टाकते आणि संत्र्याचा रस त्वचा सुधारण्याचे काम करतो.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)