नैनितालला जाताय तर या 7 सर्वोत्तम बजेट फ्रेंडली कॅफे आणि रेस्टॉरंट्सना नक्की भेट द्या
उन्हाळ्याच्या हंगामात अनेक लोकं नैनितालला फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. पण तिथे गेल्यानंतर खाण्यासाठी आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरतच असतो. पण आता तुमच्या सोबत असे घडू नये यासाठी आम्ही तुम्हाला नैनितालमधील 7 सर्वोत्तम बजेट फ्रेंडली कॅफे आणि रेस्टॉरंट्सबद्दल सांगणार आहोत.

नैनिताल हे उत्तराखंडमधील एक अतिशय लोकप्रिय हिल स्टेशन आहे, जे तेथील मोठे तलाव, पर्वत आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. दरवर्षी हजारो लोकं उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये किंवा आठवड्याच्या शेवटी भेट देण्यासाठी येथे येतात. येथील मॉल रोड, तलावाच्या काठावरील थंड वारा, बोटींवरील प्रवास आणि सुंदर सूर्यास्त कोणत्याही पर्यटनाच्या हृदयाला स्पर्शून जातात. पण फक्त दृश्येच नाही तर नैनितालचे जेवण आणि कॅफे संस्कृतीही तितकीच खास आहे.
जर तुम्हीही नैनितालला भेट देण्याचा विचार करत असाल आणि जास्त खर्च न करता चविष्ट जेवण कुठे मिळेल याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. येथे आपण नैनितालमधील अशा 7 सर्वोत्तम बजेट फ्रेंडली कॅफे आणि रेस्टॉरंट्सबद्दल सांगणार आहोत जेथे जेवणाची चव अप्रतिम आहे. वातावरण आणि किमतीच्या बाबतीत देखील परिपूर्ण आहेत.
सोनम फास्ट फूड सेंटर
मॉल रोडजवळ असलेल्या या छोट्या स्टॉलवर तुम्हाला या शहरातील सर्वात चविष्ट आणि रसाळ मोमोज मिळतील. विशेषतः त्यांचे स्टीम मोमोज आणि लाल चटणी, एकदा खाल्ल्यानंतर तुम्हाला ते पुन्हा पुन्हा खावेसे वाटेल. इथे किंमतही जास्त नाही. येथील मेनू 50 रुपयांपासून सुरू होतो. जर तुम्ही इथे आलात तर व्हेज/चिकन स्टीम मोमोज आणि तेथील थुकपा नक्की ट्राय करा.
शेर-ए-पंजाब ढाबा
तुम्हाला जर दाल मखनी, बटर चिकन किंवा लच्छा पराठा यांसारखे देसी पंजाबी पदार्थ हवे असतील तर मल्लीतालमधील हे ठिकाण तुमच्यासाठी आहे. तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला भरपूर पदार्थ मिळतील. येथे 500 रुपयांत 2 लोकं सहजपणे पोटभर जेवू शकतात.
कॅफे लेकसाईड
तलावाजवळ असलेले हे कॅफे त्याच्या नावाप्रमाणेच एक परिपूर्ण वातावरण निर्माण करते. व्हुडन इंटिरीअर, अनप्लग गाणे आणि समोरील तलावाचे दृश्य अत्यंत सुंदर असते. इथे येणारा प्रत्येकजण त्याच्या वातावरणात हरवून जातो. हॉट चॉकलेट, चीज गार्लिक ब्रेड, मोजिटो हे येथे सर्वाधिक विकले जाणारे पदार्थ आहेत. तसेच, हे ठिकाण एक परिपूर्ण इंस्टा स्पॉट आहे, जिथे तुम्ही भरपूर फोटो काढू शकता.
View this post on Instagram
View this post on Instagram
ब्रिटनीचे कॅफे हे एक लहान पण खूप चांगले ठिकाण आहे. हे घरातील बेक पदार्थ आणि चविष्ट सँडविचसाठी ओळखले जाते. येथील शांतता आणि सर्विस दोन्ही कौतुकास्पद आहेत. इथे आलात तर आईस्क्रीम आणि फ्रेंच टोस्टसोबत ब्राउनी खायला विसरू नका. हे तुम्हाला कमी पैशात उत्तम चव देखील देते.
https://www.instagram.com/p/CmDrp1kvc8m/?utm_source=ig_embed&ig_rid=dc5a9a0d-359b-4f8f-ab27-d604abb45790
सायक्लीज रेस्टॉरंट अँड पेस्ट्री शॉप
सेकेलिज हे नैनितालमधील सर्वात जुन्या आणि लोकप्रिय रेस्टॉरंट्सपैकी एक आहे. येथे तुम्हाला उत्तम जेवणाचा अनुभव मिळेल, तेही एका हिल स्टेशनच्या मध्यभागी. येथील व्हुड फायर्ड पिझ्झा, रेड वेलवेट केक आणि पास्ता खूप लोकप्रिय आहेत. शिवाय, ते बजेट फ्रेंडली देखील आहे. येथे तुम्हाला इनडोअर आणि आउटडोअर दोन्ही ठिकाणी बसण्याची सोय मिळेल.
कॅफे चिका
मॉल रोडपासून थोडे अंतरावर, चिका कॅफे झाडांच्या मध्ये आहे. हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि एकट्या प्रवाशांसाठी स्वर्गासारखे आहे. येथील सुंदर दृश्य पाहण्यासारखे आहे. तुम्ही इथे बसून ऑरगॅनिक चहा, अंड्याचा बाऊल, घरगुती कुकीजचा आस्वाद घेऊ शकता. हे ठिकाण शांत आहे, हिरवळीने वेढलेले आहे आणि पूर्णपणे ऑफबीटचा अनुभव देते.
कास्क कॅफे आणि बार
नैनितालमध्ये जर तुम्हाला थोडा आधुनिक आणि उच्च दर्जाचा अनुभव हवा असेल, तर कास्क कॅफे तुमच्यासाठी आहे. येथे मॉकटेल आणि कॉफीपासून ते हलके संगीत आणि बार सेवेपर्यंत सर्व काही आहे. एकदा येथील ब्लू लगून, तंदुरी स्नॅक्स आणि चीज प्लेटरचा आस्वाद घ्या. येथे तुम्हाला तरुणांचा जमाव आणि एक उत्तम व्यवस्था मिळेल.