Alcohol Side Effects: दारु पिण्याचे हे आहेत दुष्परिणाम, दुर्लक्ष करु नका
Alcohol Side Effects: मद्य हे आता बऱ्याच लोकांच्या जीवनशैलीचा एक भाग बनले आहे. पार्टी आणि उत्सवा दरम्यान दारु ही सर्व्ह केली जाते. अल्कोहोल नेहमीच आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून हे पुन्हा समोर आले आहे. दारूच्या हानिकारक परिणामांबद्दल जाणून घ्या.
मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे आज मद्य हे अनेकांसाठी सामान्य गोष्ट झाली आहे. लोकं अनेक अशा सवयींना बळी पडत आहेत, ज्याचा त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. दारू पिणे हे कधीही चांगले नाही. दारु प्यायल्याने आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचते. लोकांना यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. आता नवीन वर्ष सुरु होणार आहे. तेव्हा देखील मोठ्या प्रमाणात दारुची विक्री होते. सेलिब्रेशन आधी त्याचे दुष्परिणाम जाणून घ्या.
तुम्ही देखील पार्टी करताना दारूचे सेवन करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. अलीकडेच अल्कोहोल पिण्याबाबत एक अभ्यासात असे आढळून आले की, जे लोक जास्त मद्यपान करतात त्यांना अल्कोहोल-संबंधित सिरोसिस होण्याची शक्यता सहा पटीने जास्त असते.
कमकुवत प्रतिकारशक्ती
अधिक प्रमाणात जर दारु पित असाल तर तुमच्या शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होते. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याने इतर आजारांना बळी पडू शकता.
उच्च रक्तदाब
अल्कोहोलचे सेवन केल्यामुळे रक्तदाब देखील वाढतो. मद्यपान केल्याने सतत उच्च रक्तदाब होऊ शकतो. ज्यामुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका असतो.
पचन समस्या
मद्यपान केल्याने तुमच्या पचनशक्तीवर देखील परिणाम होतो. जीवनसत्त्वे आणि पोषक द्रव्ये योग्यरित्या शोषून घेण्याच्या आणि अन्न पचवण्याच्या आपल्या आतड्याच्या क्षमतेस अडथळा आणू शकतात.
मानसिक आरोग्यावर परिणाम
मद्यपान केल्याने मानसिक आरोग्यावर देखील नकारात्मक परिणाम होतो. अल्कोहोल पिण्याचे व्यसन असल्यास चिंता आणि नैराश्य यासारख्या अनेक मानसिक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.