6 देशांत रहा, व्यवसाय करा आणि 20 लाख मिळवा, तुमच्यासाठी भन्नाट ऑफर
कोरोनामुळे संपूर्ण जगाचे संपू्र्ण समिकरणचं बदलून गेले. अशातच भरतातील लोकांना परदेशातील देश वेगवेगळी विलोभन देऊन आकर्षित करत आहेत. जगभरातील काही देशांमध्ये जे लोक तेथे जाण्यास इच्छुक आहेत त्यांना वेगवेगळेया ऑफर देत आहेत.
मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण जगाचे संपू्र्ण समिकरणचं बदलून गेले. अशातच भरतातील लोकांना परदेशातील देश वेगवेगळी विलोभन देऊन आकर्षित करत आहेत. जगभरातील काही देशांमध्ये जे लोक तेथे जाण्यास इच्छुक आहेत त्यांना वेगवेगळेया ऑफर देत आहेत. जे लोक तिथे व्यवसायकरण्यासाठी इच्छुक आहेत ते त्यांना आर्थिक मदत देत आहेत, तर काही लोक त्यांची घरे नूतनीकरणासाठी अशा लोकांना विकत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या यादीमध्ये कोणत्या देशाचा समावेश होतो.
स्पेन
स्पेनचा पोंगा, प्रांत आणि अस्टुरियसचा स्वायत्त प्रदेश, त्यांना स्थायिक होण्यासाठी € 3000 पर्यंत पैसे देऊ करत आहे, शहरात जन्मलेल्या प्रत्येक बाळासाठी अतिरिक्त € 3000 देण्यात येत आहे.
स्वित्झर्लंड
स्वित्झर्लंडमध्ये जाण्यास इच्छुक असलेल्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे. स्वित्झर्लंडची अल्बिनेन शहर एक अनोखी ऑफर देत आहे. शहराची लोकसंख्या वाढवण्यासाठी, ते 45 वर्षांखालील लोकांना तेथे जाण्यासाठी $ 25,200 देऊ करत आहे.परंतू ही ऑफर स्वीकारण्यासाठी त्या देशासोबत 10 वर्षा त्या देशात राहण्यासाठीचा करार करावा लागणार आहे. या व्यतिरिक्त, तुम्ही एकतर स्वित्झर्लंडचे रहिवासी असणे आवश्यक आहे किंवा तुम्ही स्विस रहिवाशी विवाहित असणे आवश्यक आहे.
इटली
इटलीमध्ये सार्डिना, सिसिली, मिलानो आणि अब्रुझो सारखे अनेक प्रदेश आहेत जे आपण स्वप्नातही पाहिले नव्हते अशा किंमतीत घरे विकत आहेत. म्हणून जर तुम्ही इटलीला जाण्याचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे सुर्वणसंधी आहे.
चिली
जर तुम्ही उद्योजक असाल, आणि व्यवसाय सुरू करू इच्छित असाल, तर चिली देश तुम्हाला आतिरिक्त आर्थिक मदत करत आहे. एका अहवालात असे म्हटले आहे की स्टार्ट-अप चिली अनेक वर्षांपासून प्रारंभिक-स्तरीय उद्योजकांना एका कार्यक्रमातून मदत करत आहे जे 25 दशलक्ष पैसे ऑफर करते. या उपक्रमा अंतर्गत अर्जदारांना एक वर्षाचा वर्क व्हिसा देखील मिळतो , जेणेकरून त्यांना चिलीमधील व्यावसायांना चलना मिळेल.
मॉरिशस
तुमच्याकडे व्यवसाय करण्याची कोणती आयडिया असेल तर मॉरिशस हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो. तुमच्या आयडियासाठी मॉरिशस सुमारे 20000 मॉरिशस रूपये ऑफर करत आहे. तुम्हाला फक्त एक फायदेशीर आणि अनोखी व्यवसायाची कल्पना एका समितीसमोर सादर करायची आहे, तुम्ही पात्र आहात की नाही हे ती समिती ठरवेल.
आयर्लंड
जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आयर्लंड हे आदर्श ठिकाण असू शकते. एका अहवालानुसार, एंटरप्राइझ आयर्लंड ही नवीन योजना व्यवसायांना आधार देणार आहे, ही योजना स्टार्ट-अप व्यवसायांना € 120 दशलक्ष पर्यात मदत करणार आहे. अर्ज करण्यासाठी, तुम्हाला आयरिश असणे आवश्यक नाही, आपल्याला फक्त आयर्लंडमध्ये आपला व्यवसाय नोंदणी करणे आवश्यक आहे.
इतर बातम्य :
Mental Fitness : तीक्ष्ण आणि निरोगी मेंदूसाठी ‘हे’ पदार्थ आहारात समाविष्ट करा!
लोहाची कमतरता दूर करण्यासाठी ‘या’ निरोगी पेयांचा आहारात समावेश करा!
Chanakya Niti | आचार्य चाणाक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी कराच नाहीतर पश्चातापाचे भोग भोगावे लागतील!https://t.co/Qk5CnC2R86#chanakyaniti | #4things | #Hindu
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 20, 2021