घरातील नोकरांसमोर चुकूनही बोलू नका ‘या’ ५ गोष्टी, अन्यथा…
घरातील नोकरांना घरात काम करताना घरातील प्रत्येक व्यक्ती बद्दल तसेच घराबद्दल संपूर्ण माहिती ठाऊक असते. पण हे तुमच्यासाठी आणि घरातील लोकांच्या सुरक्षतेसाठी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे घरकाम करणाऱ्या नोकरांसमोर चुकूनही या ५ गोष्टींबद्दल चर्चा करु नका
Lifestyle Tips : आजच्या घडीला बहुतेक घरांमध्ये घरकामासाठी नोकर ठेवले जातात. विशेषत: ज्या कुटुंबात पती-पत्नी दोघेही नोकरी करत असतात, त्या घरात सहज कामासाठी नोकर ठेवण्याला प्राधान्य दिले जाते. बदलत्या काळानुसार लोकांच्या विचारसरणीत आणि दृष्टिकोनात बराच बदल झाला आहे. त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिलांसाठी व नोकरांसाठी एक सकारात्मक गोष्टही घडली आहे. आता त्यांना अधिक मोबदल्याबरोबरच चांगले उपचार ही मिळतात. अनेक लोकं त्यांना अगदी घरातल्यांप्रमाणे वागणूक देतात.
घरातील नोकरांना घरात काम करताना घरातील प्रत्येक व्यक्तीबद्दल तसेच घराबद्दल संपूर्ण माहिती ठाऊक असते. घरकाम करणाऱ्या नोकराच्या मनात घरातील एखाद्या व्यक्तीबद्दल थोडा तरी द्वेष निर्माण झाला, तर ते तुमच्यासाठी आणि घरातील सुरक्षतेसाठी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे घरकाम करणाऱ्या नोकरांसमोर चुकूनही या ५ गोष्टींबद्दल कधीही चर्चा करू नये.
– आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक तिजोरी असते. त्यात आपण आपले मौल्यवान दागिने वस्तू तसेच पैसे ठेवतो. त्यामुळे घरातील नोकरांसमोर चुकूनही तिजोरीत ठेवलेल्या गोष्टींबद्दल बोलू नये.
– तुम्ही जर एखाद्या मोठ्या गोष्टींची खरेदी करून आला तर त्या गोष्टी नोकरांसमोर कधीच उघडून दाखवू नका. त्यासोबतच आणलेल्या महागड्या वस्तूच्या किंमतीबद्दल देखील बोलणे टाळा. कारण महिन्याला २००० रुपये देणाऱ्या नोकरांसमोर तुम्ही मोठया खर्चाबाबत बोलणे योग्य ठरणार नाही.
– तुम्ही कुठे बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर त्या बाबतची माहिती घरकाम करणाऱ्या नोकरांसमोर कधीच बोलू नका. तुम्ही कुठे जात आहात, किती वाजता जाणार आहात, केव्हा परत येणार, किती खर्च येईल इत्यादी कोणत्याही गोष्टींबद्दल घरकाम करणारे नोकर घरात नसतील तेव्हा चर्चा करा.
– मुले कोणत्या शाळेत आहेत, त्यांची फी किती आहे, ते कोचिंग किंवा प्रॅक्टिससाठी कुठे जातात, त्यांना कोण आणते आणि सोडते, त्यांची वेळ काय आहे, तुम्ही त्यांना किती पॉकेटमनी देता, ते कुठे फिरणार आहेत अशी कोणतीही माहिती नोकरांना देऊ नका.
– मोबाईल आणि इंटरनेट अशा दोन गोष्टींमुळे आपल्या जीवनातील अनेक सोयी-सुविधा या सोयीस्कर झाल्या असल्या तरी त्याचा सुरक्षेलाही सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे. फक्त थोडीशी माहिती इतर व्यक्तीला समजली आणि आपली संपूर्ण बँक खाते रिकामे झाले असे अनेकदा घडल्याचे आपण ऐकतो. त्यामुळे घरातील काम करणाऱ्या नोकरांसमोर त्यासंबंधी अधिक माहितीची चर्चा करू नका. आपला स्मार्टफोन नेहमी लॉक करण्याची सवय ठेवा आणि मुलांना हीच गोष्ट शिकवा.