Geyser Blast Alert : या सवयीमुळे जीवावर बेतू शकते संकट! अंघोळ करताना गीझरचा होईल स्फोट

Geyser Blast Alert : या सवयी तुमच्या आणि कुटुंबियांच्या जीवावर बेतू शकतात.

Geyser Blast Alert : या सवयीमुळे जीवावर बेतू शकते संकट! अंघोळ करताना गीझरचा होईल स्फोट
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 7:56 PM

नवी दिल्ली : कडाक्याच्या थंडीत अंघोळीसाठी गरम पाणी लागतेच. ग्रामीण भागात चुलीवर, गॅस शेगडीवर पाणी तापविण्यात येते. पण शहर, निम शहरी भागात पाणी तापविण्यासाठी गीझरचा वापर करण्यात येतो. गीझरचा वापर सुरक्षित मानण्यात येतो. पण गीझरचा वापर करताना थोडाही निष्काळजीपणा तुमच्या जीवावर बेतू शकतो. अंघोळ करतानाच गीझरचा स्फोट (Geyser Blast) झाल्याच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो. काही घटना तर आपल्या आजूबाजूलाही घडल्या आहेत. नेमक्या कोणत्या चुकीमुळे असा प्रसंग ओढावतो, हे समजून घ्या

आजकल प्रत्येक आधुनिक घरात इलेक्ट्रिक गीझरचा वापर होतो. जर या गीझरला बऱ्याच वेळपर्यंत ऑन करुन तसेच सोडून दिल्यसा गीझर गरम होते. अतिप्रमाणात गीझर गरम झाल्याने त्याचा स्फोट होतो. अशावेळी जो सर्वात शेवटी अंघोळीला जातो, त्याच्यासह संपूर्ण कुटुंबावर आपत्ती कोसळते.

गीझर ऑन राहिल्यास त्याचा दबाव बॉयलरवर पडतो. लीकेजची समस्या निर्माण होते. बॉयलर लीक झाल्यास करंटमुळे अंघोळ करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू होतो. क्षारयुक्त पाण्याचा वापर करत असाल तर दर दोन वर्षांनी गीझरची दुरुस्ती, देखभाल करुन घेणे आवश्यक आहे. नाहीतर शॉर्ट सर्किट होण्याची भीती असते.

हे सुद्धा वाचा

गीझरमध्ये उष्णता निर्माण करणाऱ्या स्वयंचलित कॉईल्स, सेंसर, संवेदक असतात. त्यांनी काम करणे बंद केल्यास गीझर फुटण्याचा धोका वाढतो. अशावेळी देखभाल, दुरुस्ती आवश्यक ठरते.

अशावेळी काळजी घेणे आवश्यक आहे. अंघोळ करताना गीझर नेहमी बंद ठेवावा. अंघोळीपूर्वीच गीझर लावून पाणी गरम करणे आवश्यक आहे. हे पाणी अगोदरच एखाद्या पाण्याचा बादलीत जमा करावे.

गीझर भिंतीला अगदीच चिकटून लावू नये. भिंत आणि गीझरमध्ये थोडेफार अंतर ठेवावे. गीझर खरेदी करताना त्याचे रेटिंग आवश्य तपासून घ्या. चांगल्या दर्जाचे आणि ब्रँडचेच हीटर निवडा. गीझरची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती करत रहावी.

चांगल्या दर्जाचा गीझर लावावा. या गीझरवर ISI चिन्ह असणे आवश्यक आहे. स्वयंचलित चालू बंद होणाऱ्या गीझरची निवड करणे अत्यावश्यक आहे. वॉटर हीटरवरील सुरक्षा सूचना जरुर वाचून घ्या. जर गीझर लीक होत असेल तर वीजेचा पुरवठा आपोआप बंद होणारे गीझर निवडा. त्यामुळे बटणाला हात लावताना कोणताच झटका लागणार नाही.

हीटरची खरेदी करताना ते शॉकरहीत असेल याची काळजी घ्या. गीझरमध्ये प्रेशर कंट्रोल फीचर असायला हवे. त्यामुळे अतिरिक्त ताण आल्यास ते सहन करेल, त्याची माहिती एखाद्या इशाऱ्याने देईल. वेळोवेळी गीझरची देखभाल करावी. गीझरची फिटींग इंजिनिअरकडून करावी.

'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.