Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दृष्टी सुधारण्यासह अकाली येणारे वृद्धत्व थांबवतं, या कडधान्याचे फायदे सॉलिड !

कडधान्यांना सुपर फूड देखील म्हटले जाते. स्प्राऊटचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. ज्याची चव आणि गुणधर्म देखील वेगळे आहेत. मोड आलेले मेथीचे दाणे किंचित तिखट, कडू पण अत्यंत पौष्टिक आणि औषधी असतात.

दृष्टी सुधारण्यासह अकाली येणारे वृद्धत्व थांबवतं, या कडधान्याचे फायदे सॉलिड !
Follow us
| Updated on: Nov 08, 2024 | 9:13 PM

कोंब आलेल्या धान्याला इंग्रजीत स्प्राउट्स असे म्हणतात. भरपूर पोषक असलेल्या कडधान्यांच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.  हे धान्य किंवा बियांना मोड आणून केले जातात. कडधान्यांना सुपर फूड देखील म्हटले जाते. स्प्राऊटचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. ज्याची चव आणि गुणधर्म देखील वेगळे आहेत. मोड आलेले मेथीचे दाणे किंचित तिखट, कडू पण अत्यंत पौष्टिक आणि औषधी असतात. मोड आलेल्या धान्याचे अनेक प्रकार आहेत. आज अशाच काही स्प्राऊट्सचे फायदे आपण जाणून घेणार आहोत.

पोषण मिळते

कोंब आलेले कडधान्य हे पौष्टिक घटकांचा खजिना आहे. ज्याचा तुमच्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम होतो त्यामध्ये अनेक जीवनसत्वे, खनिजे आणि इतर आवश्यक पोषक घटक असतात ज्याचा तुमच्या शरीराला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो.

वजन कमी करण्यास मदत करते

एक वाटी कडधान्यांमध्ये १०० पेक्षा जास्त कॅलरीज असतात आणि सर्व आवश्यक पोषक तत्त्वाने भरलेल्या असतात हे खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते आणि बराच वेळ भूक लागत नाही त्यामुळेच मोड आलेले कडधान्य वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात.

दृष्टी सुधारते

अंकुरलेल्या धन्यवाद व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते आणि ते दृष्टी सुधारण्यास महत्त्वाची भूमिका बजावते. कडधान्यांमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म देखील असतात जे डोळ्यांच्या पेशींना मुक्त रॅडिकल्स मुळे होणारे ऑक्सिडेक्टिव्ह नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करतात.

अकाली येणारे वृद्धत्व थांबवते

स्प्राऊट्सच्या सेवनाने अकाली वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात. एंटीऑक्सीडेंट्स आणि निरोगी जीवनसत्वे समृद्ध असल्याने स्प्राऊट नैसर्गिकरीत्या त्वचा उजळवते आणि अकाली येणाऱ्या सुरकुत्या रोखते.

पचण्यास मदत करते

स्प्राऊटस रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात आणि शरीर स्वच्छ करण्यास देखील मदत करतात. हे बद्धकोष्ठता आणि अतिसार प्रतिबंधित करते यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने कोलन कॅन्सरची शक्यता देखील कमी होते यामध्ये असलेले पोषक तत्व शरीरात सहज पचतात.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.