मॉडेलपेक्षा भारी दिसणारा सब-इन्स्पेक्टर, हिरोसारखी पर्सनॅलिटी, रोज 25 अंडी खातो, 2 लिटर दूध पितो
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक सब-इन्स्पेक्टर आहे, जो मॉडेलपेक्षाही भारी दिसतो. एसआय रवींद्र सिंग असे त्याचे नाव आहे. त्याची फॅन फॉलोइंगही खूप चांगली आहे. फीट राहण्यासाठी तो कोणता आहार घेतो? त्याचे वर्कआउट रूटीन काय आहे ? जाणून घ्या सविस्तर माहिती.
पोलिसात भरती होण्याचे अनेकांचे स्वप्न असते, परंतु तेच लोक पोलिस सेवेत (police service) सामील होऊ शकतात, जे पूर्ण झोकून, मेहनत आणि समर्पणाने तयारी करत असतात. असे बरेच लोक आहेत जे आधी इतर नोकरीत होते पण नंतर त्यांना कळले की त्यांना पोलिस खात्यात जायचे आहे. यानंतर ते लोक कष्ट करून पोलिसात भरती होतात. आज आपण अशाच एका पोलीस कर्मचाऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत जो पेशाने इंजिनिअर (Engineer by profession) आहे, पण जेव्हा त्याला जाणवले की इंजिनीअरिंगनंतरही तो आनंदी नाही, तेव्हा त्याने देशसेवेचा मार्ग निवडला आणि मध्य प्रदेश पोलिसात दाखल झाला. त्याचा फिटनेस इतका अप्रतिम (Fitness is so amazing) आहे की तो कोणत्याही मॉडेलपेक्षा कमी दिसत नाही. जाणून घ्या, कोण आहेत हे पोलीस इन्स्पेक्टर आणि काय आहे त्यांच्या फिटनेसचे रहस्य?
कोण आहेत हे हॅण्डसम पोलीस इन्स्पेक्टर
रवींद्र सिंग असे या हॅण्डसम पोलिसाचे नाव असून तो मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये उपनिरीक्षक आहे. माध्यमांशी बोलतांना रवींद्र सांगतात, “मी 2016 मध्ये पोलिसात रुजू झालो. मी आधी पोलीस सेवेत रुजू होण्याच्या मन:स्थितीत नव्हतो, पण अभियांत्रिकी केल्यानंतर मला समजले की मी नोकरीत खूश नाही आणि नोकरी करण्याच्या मन:स्थितीत नाही. यानंतर मी बँकिंग क्षेत्रात जाण्याची तयारी केली पण मला त्यातही आनंद वाटला नाही. मग मी, बँकेची तयारी सोडून पोलीस सेवेत रुजू होण्याचा निर्धार केला आणि दीड वर्ष पूर्ण मेहनत घेऊन तयारी केली. यानंतर 2016 मध्ये दुसऱ्या प्रयत्नातच रवींद्र सिंग मध्य प्रदेश पोलिसात उपनिरीक्षक झाले.
त्यांच्या दुबळ्या शरीरामुळे लोक टिंगल करायचे
एसआय रवींद्र सांगतात, “मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी खूप बारीक होतो आणि त्यामुळे लोक माझी टिंगल करायचे. मी 20 वर्षांचा असताना मी पहिल्यांदा जिम पाहिली. हळूहळू मला जिममध्ये व्यायाम आणि आहाराविषयी माहिती मिळाली आणि मग माझे वजन वाढू लागले. माझे वजन एक-दोन वर्षांत वाढले असे मी म्हणणार नाही. 11 वर्षांनंतरही मी माझ्या फिटनेसवर काम करत आहे. माझी फिटनेसची प्रगती हळूहळू होत आहे. आज माझे वजन 91 किलो आहे आणि मी माझा फिटनेस कायम राखतो.
एसआय रवींद्र हा आहार घेतात
एसआय रवींद्र म्हणतात, “आपण पोलिसांच्या नोकरीत २४ तास सक्रीय असायला हवे. कारण, जेव्हा आपत्कालीन परिस्थिती येते. तेव्हा, ड्युटीसोबत फिटनेस राखणे अवघड होते. पण तरीही मी रोज एक ते दीड तास व्यायामासाठी काढतो. जर मला आहाराची योग्य काळजी घेता येत नसेल, तर मी माझ्यासोबत ड्राय फ्रूट्स, हाय प्रोटीन ठेवतो जे आपत्कालीन परिस्थितीत माझ्या जेवणासाठी उपयुक्त आहेत. जर आपण आहाराबद्दल बोललो तर माझ्या आहारात सुमारे 25 अंड्यांचा पांढरा भाग, सुमारे दीड ते दोन लिटर दूध, दह्यातील प्रथिने, ड्रायफ्रुट्स, डाळी, तांदूळ, भाज्या, भाकरी यांचा समावेश आहे.
एसआय रवींद्र यांचा व्यायाम
रवींद्र पुढे सांगतात, “मी कधीही सिक्स पॅक अॅब्स बनवण्यावर लक्ष केंद्रित केले नाही, मी फक्त फिटनेसवर लक्ष केंद्रित केले आहे. मला वाटते की मी माझा फिटनेस राखू शकतो. मी रोज जिमला जातो आणि व्यायाम करतो. मी दररोज शरीराच्या एकाच भागाचा व्यायाम करतो. जे मला फिट राहण्यास मदत करते. याशिवाय अनेक वेळा वेळ मिळेल तेव्हा पायी चालत जातो. जे मला कॅलरीज बर्न करण्यास मदत करते. रवींद्र सिंगच्या या प्रवासाबाबत आजतक हिंदीने सविस्तर वृत्त प्रसारीत केले आहे.