करोडो रुपयांच्या संपत्तीचा त्याग करुन या उद्योगपतीचा मुलगा बनला बौद्ध भिक्षू
पैसा कमवण्यासाठी लोकं जीवाचं रान करतात. अनेकांना असं वाटतं की, भौतिक सुख मिळवायचं असेल तर पैसा हवाच. पण काही लोकांकडे करोडो रुपयांची संपत्ती असूनही ते त्याचा त्याग करुन वेगळा मार्ग निवडतात. अशीच एक व्यक्ती आहे ज्यांनी आपल्या वडिलांची संपत्ती सोडून बौद्ध भिक्षू होण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकं पैसे कमवण्यासाठी खूप मेहनत करतात. आज मेहनतीच्या जोरावर अनेकांनी मोठी संपत्ती कमवली आहे. अनेक मोठ्या उद्योगतींनी आपल्या शेवटच्या काळात पैसा सर्वकाही नसल्याचं म्हटलं होतं. पैशाने सगळंच मिळत असं नाही. काही गोष्टी त्या पेक्षाही अधिक मौल्यवान असतात. अशीच एक घटना आम्ही तुम्हाला सांगत आहोत. जेथे एका अब्जाधीशांच्या मुलाने भौतिक जीवनाला महत्त्व न देता अध्यात्मिक जीवन जगण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने कोट्यवधींची संपत्ती सोडली आणि संन्यासी झाला आहे.
अजहन सिरीपान्यो याने बौद्ध भिक्षू होण्याचा निर्णय घेतलाय. त्याचे वडील मलेशियतील एक मोठे अब्जाधीश आहेत. त्याच्या वडिलांचे नाव आनंद कृष्णन आहे. जे दूरसंचार क्षेत्रातील मोठं नाव आहे. आनंद कृष्णन यांची संपत्ती सुमारे 40,000 कोटींपेक्षा जास्त आहे.
मलेशियाचे अब्जाधीश आनंदा कृष्णन यांना वेन अजहन सिरीपान्यो हा एकुलता एक मुलगा आहे. तो आता बौद्ध भिक्षू बनला आहे. त्यामुळे त्याने त्याच्या सर्व संपत्तींचा त्याग केलाय. आनंदा कृष्णन यांना एके नावानेही ओळखले जाते. एके हे मलेशियातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. दूरसंचार, मीडिया, रिअल इस्टेट सारख्या वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचा उद्योग पसरला आहे. एअरसेल ही देखील त्यांचीच कंपनी आहे. जी एकेकाळी भारतात देखील व्यवसाय करत होती. IPL संघ चेन्नई सुपर किंग्जची ती प्रायोजित राहिली आहे.
वयाच्या 18 व्या वर्षी, वेन अजहन सिरीपान्यो हे आपल्या आईच्या कुटुंबाला भेटण्यासाठी थायलंडला गेले होते. या दरम्यान त्यांना जो अनुभव आला त्यामुळे त्याने कायमस्वरूपी संन्यासी जीवन जगण्याचा निर्णय घेतला.
अजहन आता एक वन संन्यासी म्हणून जीवन जगत आहे. ते दाताओ डॅम मठाचे आता मठाधिपती आहे. थायलंडच्या राजघराण्यातील ते वंशज देखील आहेत. सिरीपान्योच्या यांना आठ भाषा येतात. इंग्रजी तर ते बोलतातच पण त्यांना तमिळ आणि थाई भाषा देखील बोलता येते. सन्यासी झाल्यानंतर ही ते आपल्या वडिलांना भेटण्यासाठी वेळ काढतात. कारण बौद्ध धर्मातील सिद्धांत कौटुंबिक प्रेमावरही भर देतो.