15 वर्षापासून एकाच पद्धतीचे आयुष्य जगतो हा माणूस, कारण ऐकून थक्क व्हाल

एकाच पद्धतीचे आयुष्य आपण काही दिवस जगलो. तरीदेखील आपल्याला कंटाळा येतो पण जपान मधील एक माणूस पंधरा वर्षापासून एकाच पद्धतीने आयुष्यात जगत आहे आणि त्याच्या म्हणण्यानुसार याचे अनेक फायदे असल्याचे देखील त्याने सांगितले आहे.

15 वर्षापासून एकाच पद्धतीचे आयुष्य जगतो हा माणूस, कारण ऐकून थक्क व्हाल
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 3:46 PM

आयुष्य खूप सुंदर आहे असे आपण नेहमीच म्हणतो. असे म्हणतात की अनेक जन्म घेतल्यानंतर मानवाचा जन्म मिळतो. त्यामुळे जीवन जगताना आनंदी जगायचे, आपल्याला हव्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी करायच्या. दररोज होणारे छोटे छोटे बदल आपले आयुष्य आणखी आनंदी आणि सुंदर करत असतात.

काही लोक असे म्हणतात की एकाच पद्धतीने आयुष्य चार ते पाच वर्षे जगले तर त्यांना त्याचा कंटाळा येतो आणि ते देखील तेव्हा ज्यावेळेला त्यांचे कपडे आणि जेवण बदलत असते. अशातच जर कोणी तुम्हाला म्हणाले की पंधरा वर्षे एकच जेवण करायचे, एकाच पद्धतीचे कपडे घालायचे आणि तीच नोकरी, तीच दिनचर्या तुमची पंधरा वर्षापर्यंत राहील. त्यात कुठलेही बदल होणार नाहीत तर यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल.

आपण दोन दिवस किंवा आठवडाभर एकाच प्रकारचे जेवण केले तरी देखील आपण कंटाळतो पण एक अशी व्यक्ती आहे जी गेल्या पंधरा वर्षांपासून तेच आयुष्य जगत आहे. जपान मध्ये राहणाऱ्या या व्यक्तीने गेल्या पंधरा वर्षात एक सुद्धा बदल केलेला नाहीये तो अगदी रोबोट सारखा त्याच्या साच्यात टाकलेला आहे. पण त्याचे अनेक फायदे त्यांनी स्पष्ट केले.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार जपान मधील रहिवासी गो कीता हे ३८ वर्षांचे आहेत आणि गेल्या पंधरा वर्षापासून ते आपले जीवन एकाच साचेबद्ध पद्धतीने जगत आहे. 15 वर्षात त्यांनी नोकरी देखील बदललेली नाही. ते नाश्त्यासाठी नट आणि रॅमन खातात, तर दुपारच्या जेवणात चिकन ब्रेस्ट आणि रात्री बीन्स सोबत तळलेले डुकराचे मास खातात. त्यांचा जेवणाचे प्रमाण आणि पूरक आहार देखील ठरलेला आहे. ते दररोज त्याच शैलीचा शर्ट आणि पॅन्ट घालतात. त्यांचे सॉक्स आणि अंतर्वस्त्र देखील सारखीच आहेत. यासोबतच दाढी करणे, कपडे धुणे, नखे काढणे आणि केस कापण्यासाठी देखील त्यांची एक नियोजित वेळ ठरलेली आहे.

त्यांच्या या वागण्यामुळे आपल्याला असे वाटत असेल की का ते स्वतःला असा त्रास देता आहे. पण गो कीता यांच्या म्हणण्यानुसार, या सवयीमुळे त्यांच्या मनावरील दडपण कमी होते आणि ते प्रभावीपणे निर्णय घेऊ शकतात. गो कीता यांनी सांगितले आहे की ही प्रेरणा त्यांना जपानचे बेसबॉल खेळाडू इचिरो सुजुकी यांच्याकडून मिळाली आहे. गो कीता यांचे म्हणणे आहे की एका दिवसात आपण लहान-मोठे तीन हजारपेक्षा जास्त निर्णय घेतो. यामुळे अनेक वेळेला आपल्यावर दडपण येते. पण शिस्तबद्ध जीवन जगल्याने वेळ वाचतो आणि दबाव येत नाही. यामुळे त्यांचे जीवन दडपण आणि तणावापासून मुक्त असल्याचे ते सांगतात.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.