Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकांना ‘मिठी मारणे’ हाच व्यवसाय, महिन्याला लाखोंची कमाई

कान्सास (अमेरिका) : दोनवेळच्या अन्नासाठी कुणी काय करेल, याचा काही नेम नाही. प्रत्येकजण आपल्या ऐपतीप्रमाणे शिक्षण घेतो आणि त्यातून नोकरी शोधतो, तर कुणी व्यवसाय करतो. काही माणसं हटके असतात, ते थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार करुन आपला व्यवसायही हटकेच शोधतात. अमेरिकेतील कान्सान शहरात राहणाऱ्या रॉबिन स्टीन या महिलेनेही असाच हटके व्यवसाय शोधला आहे. नुसता शोधला नाही, […]

लोकांना 'मिठी मारणे' हाच व्यवसाय, महिन्याला लाखोंची कमाई
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

कान्सास (अमेरिका) : दोनवेळच्या अन्नासाठी कुणी काय करेल, याचा काही नेम नाही. प्रत्येकजण आपल्या ऐपतीप्रमाणे शिक्षण घेतो आणि त्यातून नोकरी शोधतो, तर कुणी व्यवसाय करतो. काही माणसं हटके असतात, ते थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार करुन आपला व्यवसायही हटकेच शोधतात. अमेरिकेतील कान्सान शहरात राहणाऱ्या रॉबिन स्टीन या महिलेनेही असाच हटके व्यवसाय शोधला आहे. नुसता शोधला नाही, तर या व्यवसायातून महिन्याला लाखो रुपयांची कमाई करते आहे. व्यवसाय काय, तर ‘मिठी मारणे’.

रॉबिन स्टीन यांच्या कामाचं स्वरुप वाचून तुम्हीही थोडे आवाक् झाला असाल. पण हे खरंय. ‘मिठी मारणे’ हाच त्यांचा व्यवसाय आहे. ‘टच थेरपी’ असे रॉबिन स्टीन यांनी या व्यवसायाला नाव दिले आहे. या ‘टच थेरपी’मुळे लोकांचा ताण-तणाव कमी होतो, असा रॉबिन स्टीन यांचा दावा आहे. ‘प्रोफेशनल कडलिस्ट’ म्हणून रॉबिन स्टीन या अमेरिकेत प्रचंड प्रसिद्ध आहेत.

रॉबिन स्टीन या एक तास मिठी मारण्याचे 80 डॉलर आकारतात. म्हणजेच, भारतीय रुपयांमध्ये हे शुल्क 5 हजार रुपयांहून अधिक होते. एक तास ते चार तास टच थेरपी चालते. म्हणजेच, रॉबिन स्टीन या महिन्याला लाखोंमध्ये कमाई करतात.

रॉबिन स्टीन जे करतात, त्याला शास्त्रीय भाषेत कडलिंग किंवा स्नगलिंग असे म्हणतात. रॉबिन स्टीन या काही कुणाला पकडून पकडून मिठ्या मारतात नाहीत. तर त्यांची स्वत:ची वेबसाईट आहे. त्या माध्यमातून त्या लोकांशी संपर्क साधतात. ‘टच थेरपी’साठी रॉबिन स्टीन यांचे काही नियम आहे. ज्या व्यक्तीला टच थेरपी करायची आहे, ती व्यक्ती पूर्ण कपडे परिधान केलेली असावी.

रोजच्या जगण्याच्या धबाडग्यात अनेकजण तणावात असतात, एकटेपणा सहन करत असतात, मग अशा लोकांना आधार देणारा कुणीतरी हवा असतो. अशावेळी टच थेरपी कामाला येते, असा रॉबिन स्टीन यांचा दावा आहे. ज्यावेळी रॉबिन स्टीन कुणाला मिठी मारुन टच थेरपीची सुरुवात करतात, त्यावेळी त्या संबंधित व्यक्तीशी त्या गप्पाही मारतात, त्या व्यक्तीच्या गोष्टीही त्या ऐकतात.

रॉबिन स्टीन यांच्याकडे टच थेरपीसाठी येणाऱ्यांमध्ये 17 वर्षांच्या तरुणांपासून 70 वर्षांच्या वयोवृद्धांपर्यंतच्या लोकांचा समावेश असतो. बरं यात केवळ पुरुषच असतात असेही नाही. महिलाही टच थेरपीसाठी रॉबिन स्टीन यांच्याकडे येतात.

टच थेरपीची रॉबिन स्टीन यांनी योग्य ते प्रशिक्षण घेतले आहे. या व्यवसायासाठी त्यांच्या जोडीदाराचीही परवानगी आहे. एका आठवड्यात 45 तास त्या टच थेरपीवर खर्च करतात आणि त्यातून लाखोंची कमाई करतात.

पाहा व्हिडीओ :

'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला.
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा.
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला.
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी.
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.