कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘हे’ खास पेय प्या !

सध्याच्या कोरोना काळात स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘रोगप्रतिकारक शक्ती’ हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे.

कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 'हे' खास पेय प्या !
वजन कमी करण्यासाठी खास पेय
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 6:00 PM

मुंबई : सध्याच्या कोरोना काळात स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘रोगप्रतिकारक शक्ती’ हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नेमक्या कोणत्या पदार्थांचे सेवन करावे. याबाबत लोक नेहमी संभ्रमात असतात. कोरोना महामारीच्या काळात जो-तो आपल्या कुटुंबासह स्वतःची काळजी घेण्यात व्यस्त आहे. आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. (This special drink to boost the immune system during the corona period)

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खास पेय तयार करण्यासाठी आपल्याला आठ ते दहा तुळशीची पाने आणि मध लागणार आहेत. सर्वात प्रथम आपल्याला एक ग्लास पाणी लागणार आहे. हे पाणी मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवा त्यानंतर त्यामध्ये तुळशीची पाने घाला आणि साधारण वीस ते तीस मिनिटे गरम होऊद्या त्यानंतर या पाण्यात मध घाला आणि हे पाणी प्या. हे पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

तुळशीमध्ये अँटीबायोटिक, अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात. आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी तुळश कार्य करते. तुळशीची पाने ताप आणि सर्दीसाठी फायदेशीर आहेत. आपण चहामध्ये टाकून तुळशीच्या पानांचे सेवन करू शकतो. यासाठी तुळशीची पाने पाण्यात उकळावी लागतील आणि त्याचे सेवन करावे लागेल. तुळशीच्या पानांचा चहा डोकेदुखी दूर करण्यासाठी चांगला आहे. आपण कपाळावर तुळशी आणि चंदनची पेस्ट देखील लावू शकता. यामुळे डोकेदुखीमध्ये आराम मिळतो.

खोकल्याचा त्रास बराच काळ बरा होत नसेल, तर मधाचे सेवन करणे खूप उपयुक्त ठरू शकते. मधात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात, जे संसर्ग रोखतात. तसेच, मध कफ सहजपणे काढून टाकतो. आपण एखादा चमचा नुसता मधही खाऊ शकता. याशिवाय आल्याच्या रसामध्ये मध मिसळून खाल्याने कफ आणि खोकल्यात खूप आराम मिळतो. घसा खवखवणे या समस्येतून आराम देण्यासाठी देखील मध फार प्रभावी आहे. जर, तुम्हाला घसा खवखवणे किंवा घसा दुखण्याची असेल, तर मध सेवन केल्यास खूप आराम मिळेल.

संबंधित बातम्या : 

चहा-कॉफी की बियर-वाईन, काय पिता तुम्ही… त्याचे फायदे-तोटे तुम्हाला माहिती आहे का?

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बदाम, लाल शिमला मिर्ची आणि मासे फायदेशीर, वाचा !

(This special drink to boost the immune system during the corona period)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.