आपल्या चेहऱ्यावरील फक्त नाकाला कव्हर करतो हा आगळावेगळा मास्क, फायदे जाणून घ्याल तर आजच खरेदी कराल !!
Unique Mask Cosk: गेल्या दोन वर्षापासून कोरोना व्हायरस (corona virus) ने जगामध्ये भीषण परिस्थिती निर्माण केलेली आहे आणि या परिस्थितीमुळे प्रत्येक जण आपल्या जीवाला जपत आहे यामुळे गेल्या दोन वर्षात अनेकांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. कोरोना पासून जर आपल्याला सुटका मिळवायची असेल तर अशा वेळी सरकारद्वारे काही विशेष असे नियमावलीस ( government guidelines) सादर करण्यात […]
Unique Mask Cosk: गेल्या दोन वर्षापासून कोरोना व्हायरस (corona virus) ने जगामध्ये भीषण परिस्थिती निर्माण केलेली आहे आणि या परिस्थितीमुळे प्रत्येक जण आपल्या जीवाला जपत आहे यामुळे गेल्या दोन वर्षात अनेकांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. कोरोना पासून जर आपल्याला सुटका मिळवायची असेल तर अशा वेळी सरकारद्वारे काही विशेष असे नियमावलीस ( government guidelines) सादर करण्यात आलेली आहे तसेच प्रत्येकाला मास्क( Mask) घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. हल्ली मास्क आपल्या जीवनाचा अनिवार्य घटक बनलेला आहे. आपण घरी असो किंवा बाहेर असो प्रत्येक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक झालेले आहे परंतु जास्त वेळ मास्क वापरलेले सुद्धा अनेकदा श्वासा संदर्भातील अनेक समस्या त्रास देतांना पाहायला मिळत आहेत म्हणून अशावेळी काही काळजी घेणे देखील गरजेचे आहे.
कोरिया कंपनीने बनवला आगळावेगळा मास्क
आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक पाहायला मिळतात की ज्यांनी जास्त काळ मास्क लावल्यावर त्यांना श्वास घेण्यास समस्या निर्माण होतात त्याचबरोबर बाहेरचे काही पदार्थ खाते – पिते वेळी सुद्धा आपल्याला मास्क बाजूला काढावा लागतो म्हणूनच अशा परिस्थितीत दक्षिण कोरिया(South Korea) येथील एका कंपनीने एक आगळावेगळा मास्क बनवलेला आहे. हा मास्क सुद्धा एक वेगळ्या प्रकारे डिझाइन करण्यात आलेला आहे म्हणूनच हा मास्क सध्या जगभरात चर्चेचा विषय बनलेला आहे.
एटमनकडून आगळावेगळा मास्क
दक्षिण कोरिया येथील कंपनी एटमन (Atman) ने या आगळ्यावेगळ्या मास्कला बनवले आहे. या मास्क बद्दल विशेष बाब म्हणजे कि, हा मास्क फक्त आपल्याला नाकावर लावायचा आहे आणि फक्त तुमचे नाक कव्हर होणार आहे परंतु हा मास्क वापरल्याने आपला चेहरा मोकळा राहतो म्हणुनच याला “कोस्क(Kosk) “असे नाव देण्यात आले आहे. जर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही संपूर्ण चेहऱ्याला हा मास्क लावू शकता परंतु जर तुम्हाला नको असल्यास फक्त तुम्ही तुमचे नाक सुद्धा या मास्कच्या आधारे कव्हर करू शकता.
श्वसनाच्या समस्या पासून मिळेल सुटका
या आगळ्यावेगळ्या स्टाईल मुळे हा मास्क खाता-पिताना सुद्धा आपल्याला उपयोगी पडणार आहे. हा मास्क अनेक व्यक्तींना जास्त फायदेशीर ठरणार आहे. ज्या व्यक्तीला वारंवार दम लागतो, श्वसनाच्या समस्या आहेत, श्वास घ्यायला अडथळा निर्माण होतो अश्या व्यक्तिंसाठी हा मास्क अत्यंत लाभदायक ठरणार आहे. या मास्कचे नाव Kosk असे ठेवले गेले आहे त्याचबरोबर या मास्कचे नाव ठेवण्यामागे सुद्धा एक महत्त्वाचे कारण आहे जसे की कोरियामध्ये नाकासाठी वापरण्यात येणारा शब्द ‘Ko’आणि मास्कसाठी वापरात येणारा शब्द याप्रमाणे दोघांना एकत्रित मिळून तयार होणारा शब्द ‘Kosk ‘ असे नाव देण्यात आले आहे.
जर तुम्हाला हा मास्क विकत घ्यायचा असेल तर हा मास्क तुम्हाला ऑनलाईन(Online Shopping) सुद्धा उपलब्ध होईल. या मास्कला KF80 असे टॅग दिले गेले आहे कारण की यामध्ये K Korean आणि F हे शब्द फिल्टरसाठी वापरण्यात आले आहेत. हा मास्क बनवणारी कंपनीने असा दावा केला आहे की ,यामध्ये 0.3 मायक्रोनचे कण यांना 80% दक्षता घेऊन फिल्टर केले जाऊ शकते.
संबंधित बातम्या