केवळ तीन चमचे दुधाने आपला चेहरा उजळेल, महागड्या प्रोडक्ट्सला आजच करा बाय बाय
लोक त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी विविध उपाय ट्राय करतात. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात.
मुंबई : लोक त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी विविध उपाय ट्राय करतात. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. परंतु, आपणास माहित आहे का की, या महागड्या उत्पादनांऐवजी काही चांगल्या सवयींचा अवलंब करून देखील आपण निरोगी त्वचा मिळवू शकता. (Three teaspoons of milk will brighten your face)
या सवयींचा अवलंब केल्याने त्वचा सुधारण्यास सुरुवात होते. सौंदर्य उत्पादन वापरण्यापेक्षा आपल्या चेहऱ्यासाठी फक्त तीन चमचा दूध फायदेशीर आहे. दूध आपली त्वचा नैसर्गिकरित्या चांगली ठेवते. दुधात लॅक्टिक अॅसिड आढळते जे त्वचेसाठी चांगले असते आणि मृत त्वचा काढून टाकण्यासाठी आणि वयाचा प्रभाव कमी करण्यासाठी कार्य करते. याशिवाय दूध त्वचेसाठी उत्तम मॉश्चरायझर म्हणूनही काम करते.
यामुळे चेहरा हाइड्रेटेड राहतो आणि डाग व मुरुमही दूर होतो. परंतु कच्चे दूध त्वचेवर वापरले गेले तर ते अधिक प्रभावी आहे. एका वाटीत तीन चमचे कच्चे दूध घ्या. सर्व प्रथम, आपला चेहरा पाण्याने चांगला धुवा आणि स्वच्छ टॉवेल्सने पुसून घ्या आणि ते कोरडे होऊ द्या. यानंतर, कापसाच्या मदतीने गळ्यापासून संपूर्ण चेहऱ्यावर दूध चांगले लावा, नंतर ते कोरडे होऊ द्या. जेव्हा ते कोरडे होईल तेव्हा आपण पुन्हा दुसरा थर लावा आणि ते कोरडे झाल्यानंतर पुन्हा तिसरा थर लावा आणि ते कोरडे होऊ द्या.
तीन चमचे दूध संपेपर्यंत ही प्रक्रिया सुरू ठेवा. जेव्हा चेहऱ्यावरील दूध पूर्णपणे कोरडे होईल त्यानंतर आपला चेहरा पाण्याने धुवा. आपल्याला चेहरा मऊ आणि मॉइश्चराइज्ड वाटेल. यानंतर काहीही लावण्याची गरज नाही परंतू जर तुमच्याकडे कोरफड असेल तर लावू शकता. रात्री झोपायच्या आधी हे दररोज करा. काही दिवसांत तुम्हाला चेहऱ्यामध्ये मोठा बदल झालेला दिसेल.
संबंधित बातम्या :
Diabetes Diet : मधुमेहाचे रुग्णांनी हे फळ खाल्ल्यास होतील फायदे, शुगर नियंत्रणात राहिल
Skimmed Milk | स्किम्ड दुधाचे सेवन करताय? थांबा! आधी जाणून घ्या याचे दुष्परिणाम…#SkimmedMilk | #Food | #health | #MILK https://t.co/3kPWs3RUkH
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 1, 2021
(Three teaspoons of milk will brighten your face)