Tips and tricks | ‘या’ उपायांनी करा पाण्याची बाटली स्वच्छ, काही मिनिटांतच होईल किटाणूंचा नायनाट !
Tips and tricks | निरोगी जीवनशैली राखण्यासाठी, बहुतेक लोक मिनरल वॉटर पिण्यावर भर देतात. आरोग्याची विशेष काळजी घ्यायची असेल तर केवळ स्वच्छ पाणी पिणं पुरेसं नाही, तर आपली पाण्याची बाटलीही स्वच्छ ठेवली पाहिजे.
Tips and tricks | पाणी हे (water) आपल्या शरीरासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. पाणी पिण्यासाठी बरेच जण बाटलीचा वापर करतात. आरोग्याची विशेष काळजी घ्यायची असेल तर केवळ स्वच्छ पाणी पिणं पुरेसं नाही, तर आपली पाण्याची बाटलीही स्वच्छ ठेवली पाहिजे. पाण्याची ही बाटली (Water bottle) स्वच्छ आणि निर्जंतूक ठेवणे हे (clean and germ free) अतिशय कठीण काम असते.
तर पाणी होऊ शकते दुषीत
अनेक जण बाटलीत पाणी तर भरून ठेवतात, पण ती बाटली स्वच्छ आणि निर्जंतूक ठेवणे विसरतात. ज्यामुळे तुम्ही पित असलेले पाणी दूषित होऊ शकते व त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. पाण्याची बाटली स्वच्छ कशी ठेवावी व ती निर्जंतूक कशी करावी याबद्दल माहिती जाणून घेऊया.
डिश सोपने करा स्वच्छ
पाण्याची बाटली स्वच्छ करण्यासाठी तुम्ही डिश सोप म्हणजेच भांडी घासण्याचा (liquid) साबण वापरू शकता. त्यासाठी एका पॅनमध्ये किंवा भांड्यात पाणी घेऊन ते कोमट करावे. त्यामध्ये 1- 2 चमचे लिक्विड सोप घालावा. नंतर त्यामध्ये पाण्याची बाटली घालून रात्रभर तशीच ठेवावी. सकाळी बाटली साध्या पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यावी.
लिंबू व मीठाचा करावा वापर
पाण्याची बाटली स्वच्छ करण्यासाठी लिंबू, मीठ आणि बर्फाचा वापर करणे हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो. यासाठी पाण्याच्या बाटलीत 1 कप पाणी घाला. नंतर त्या बाटलीत लिंबाचा रस, मीठ आणि बर्फ घाला. या सर्व गोष्टी जोरात हलवाव्यात आणि नंतर बाटली पाण्याने स्वच्छ धुवावी.
बेकिंग सोडा व व्हिनेगर
पाण्याची बाटली स्वच्छ आणि निर्जंतूक व्हावी तसेच त्यातील वास निघून जावा यासाठी बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वापर खूप प्रभावी ठरू शकतो. यासाठी बाटलीत 1 चमचा बेकिंग सोडा आणि 2 चमचे व्हिनेगर घालून चांगले मिक्स करावे. हे मिश्रण थोडा वेळ तसेच ठेवावे. त्यानंतर साध्या पाण्याने बाटली स्वच्छ धुवावी. ती नव्या बाटलीसारखी चमकेल.
ब्रशचा वापर करावा
पाण्याची बाटली ही बाहेरून साफ करणे खूप सोपे आहे. पण ती आतून पटकन स्वच्छ होत नाही. अशावेळी पाण्याची बाटली स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ब्रशचाही वापर करू शकता. त्यासाठी बाटली घासण्यचा ब्रश किंवा टूथब्रश बाटलीत घालून नीट घासा. यामुळे बाटलीच्या अंतर्भागातील घाण, धूळ निघेल , ती स्वच्छ होईल आणि काही मिनिटांत चमकेल.