मसाले जर फ्रेश ठेवायचे असतील तर या टिप्स वापरा, दिर्घकाळापर्यंत चव तशीच ठेवा
जेवण जर स्वीदिष्ट बनवायचे असेल तर त्यामध्ये मसालेंचे योगदान अधिक असते. अनेक लोकं मसाल्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतात. तर काही लोक मसाल्यावरून आपलं जेवण ठरवतात. त्यामुळे मसाल्यांना जर योग्य ठेवले नाही तर ते खराब होण्याची शक्यता आहे.
मुंबईः तुमच्या किचनमध्ये असणाऱ्या सगळ्याच मसल्यांचा वापर तुम्ही नेहमीच करता असं नाही. काही मसाले कधी तरी तुम्ही वापरता, त्यामुळे असे मसाले (Spices) खराब होण्याची शक्यता असते. मसाले जर दीर्घकाळ टिकवायचे असतील तर काही गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. सध्याच्या प्रत्येक जण मसाल्याचा वापर करत असतो. चविष्ट खाणं (Delicious food) प्रत्येकालाच आवडते, त्यामुळे तसे मसालेही वापरणे गरजेचे असते. अनेक प्रकारचे मसाले असले तरी काही मसाले हे कधी तरी वापरले जातात. ते नेहमीच्या जेवणात वापरले जात नाहीत, त्यामुळे वापरात नसलेले मसाले खराब होण्याची शक्यताही असते. घरातील मसाले खराब होऊ नये असे वाटत असेल तर काही गोष्टी या काटेकोरपणे पाळव्या लागतात, त्यामुळे मसाले खराब (Bad) होण्याची शक्यता कमी असते.
जेवण जर स्वीदिष्ट बनवायचे असेल तर त्यामध्ये मसालेंचे योगदान अधिक असते. अनेक लोकं मसाल्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतात. तर काही लोक मसाल्यावरून आपलं जेवण ठरवतात. त्यामुळे मसाल्यांना जर योग्य ठेवले नाही तर ते खराब होण्याची शक्यता आहे. मसाल्यांना योग्य पद्धतीने ठेवले गेले नाही तर जेवणातही अपेक्षित असणारी चव लागणार नाही. मसाले जर खराब झाले तर काही दिवसातच त्याला बुरशी येते. त्याला जर किड लागली तर ते मसाले पुन्हा वापरूही शकत नाही.
मसाल्यातील काही पदार्थ कायमच वापरात असतात असं नाही, त्यामुळे ते खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मसाले दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्याच्या सुरक्षितपणाची. त्यासाठी आम्ही काही तुम्हाला उपाय सांगणार आहे.
हवा बंद डबा
मसाले जर ओले झाले तर ते लवकर खराब होतात. त्यामुळे मसाल्यांना ओलावा लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा. त्यासाठी हवा बंद डब्याचा वापर करा. आणि मसाले जर जास्त दिवस हवा बंद डब्यात ठेवत असाल तरही ते खराब होऊ शकतात.
काचेच्या डब्यांचा वापर करा
मसाले काय अनेक जण वापरत असतात, पण त्या ठेवण्याच्या पद्धतीही अनेकांच्या एक सारख्याच आहेत. प्लास्टीक डबा किंवा स्टीलच्या डब्यात ठेवले जातात, मात्र पावसाळ्याच्या दिवसात काचेच्या डब्यात मसाले ठेवाल तर ते अधिक काळ फ्रेश राहतील.
गरम करून ठेवा
मसाल्यांमध्येही अनेक प्रकार असतात, खडा मसाला हाही त्यातीलच एक प्रकार त्यामुळे ते खराब होऊ नये असे वाटत असेल तर मसाल्यांना गरम करा आणि ठेवा. त्यामुळे मसाल्यांना बुरशी आणि किडही लागत नाही आणि त्याचा स्वादही चांगला राहतो.
संबंधित बातम्या