हिवाळ्यात जिमला जायचा कंटाळा येतो? मग फिट राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

हिवाळ्यात आळशीपणामुळे जिमला जाणे किंवा मॉर्निंग वॉकला जाणे शक्य होत नाही. मात्र हिवाळ्यातही शरीर ऍक्टिव्ह असणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे तुम्ही फिट राहण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहे. जाणून घेऊया घरच्या घरी फिट राहण्याच्या काही टिप्स.

हिवाळ्यात जिमला जायचा कंटाळा येतो? मग फिट राहण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
gym
Follow us
| Updated on: Dec 21, 2024 | 3:58 PM

हिवाळ्यात जास्त आळस जाणवतो. सकाळी अंथरुणातून उठून कामावर जाणे ही कठीण होते. अनेक जण इतर वेळेला सकाळी जिमला जात असतात मात्र हिवाळ्यामध्ये कॉलेजला किंवा कामावर जाण्याचा देखील आळस येतो तर जिमला जाणे लांबच राहते. पण ऋतू कोणताही असला तरी देखील स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी शरीर ऍक्टिव्ह ठेवणे अत्यंत गरजेचे असते. शरीर ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी शरीराची हालचाल होणे देखील आवश्यक आहे. जर तुम्हालाही हिवाळ्यात सकाळी जिमला जाण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही घरी बसून स्वतःला फिट ठेवण्यासाठी काही गोष्टी करू शकतात. जाणून घेऊया काही सोप्या टिप्स ज्यामुळे तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकाल.

घरीच वर्कआउट करा

तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही महागड्या उपकरणाशिवाय घरच्या घरी खूप चांगले व्यायाम करू शकता. जसे की स्क्वॅट्स, पुश-अप्स, प्लँक्स आणि बर्पी हे तुमचे वजन कमी करण्यास देखील मदत करू शकतात.

डान्स

डान्स अतिशय चांगला कार्डिओ व्यायाम आहे ज्याने तुमचा मूड चांगला होण्यास मदत होते. हिवाळ्यात तुम्ही घरीच डान्स करून कॅलरी बर्न करू शकतात. शरीराच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी ते फायदेशीर ठरते. आज काल जिम मध्ये सुद्धा झुम्बा डान्स केला जातो. ज्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार घरबसल्या डान्स करू शकता.

योगा आणि प्राणायाम

योगासने शरीर आणि मन दोन्ही साठी फायदेशीर आहेत. योगासने केल्याने शरीराची लवचिकता वाढते आणि मानसिक आरोग्यासाठीही ते फायदेशीर ठरते. सूर्यनमस्कार, भुजंगासन, वृक्षासन, अर्धचंद्रासन, अर्धचक्रासन हे तुम्ही तुमच्या आरोग्यानुसार करू शकता. लक्षात ठेवा की योगासने करताना योग्य आसन, तंत्र आणि आजार लक्षात ठेवणे आवश्यक आहे. म्हणून तज्ञांच्या देखरेखी खाली योगासने सुरू करा.

फिरायला जा

जर तुम्हाला जिम मध्ये जावेसे वाटत नसेल तर तुम्ही दिवसभरात काही वेळ फिरायला जाऊ शकता. हिवाळ्यात मॉर्निंग वॉकला जाण्याची इच्छा होत नाही त्यामुळे तुम्ही दिवसभरात कधीही फिरायला जाऊ शकता. दुपारीच्या जेवणानंतर तुम्ही फिरायला जाऊ शकता. थोड्या प्रमाणात वेगाने चालले हे देखील जास्त फायद्याचे राहील.

निरोगी आणि संतुलित आहार

हिवाळ्यात जास्त प्रमाणात बाहेरचे तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होते. पण जास्त प्रमाणात बाहेरचे किंवा तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा. त्या ऐवजी समतोल आहार घ्या जसे की हिरव्या पालेभाज्या, बीट आणि फळे. अक्रोड, बादाम आणि फ्लेक्स बियाणे शरीराला ऊर्जा प्रदान करतात. त्यासोबतच हे शरीराला आतून उबदार ठेवतात. याव्यतिरिक्त हे कॅलरीची देखील काळजी घेते. आहारासोबतच जीवनशैलीची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. रोज आठ तासाची झोप घेण्यासोबतच तणाव देखील टाळा.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.