बाजारात मिळणाऱ्या दह्यासारखं घट्ट दही घरीच बनवायचंय? मग ‘ही’ रेसिपी नक्की ट्राय करा

आपल्या जेवनातील महत्वपूर्ण घटक म्हणजे दही आहे. उष्माघात आणि निर्जलीकरण यासारख्या समस्यांपासून आपल्या शरीराचे दही रक्षण करते.

बाजारात मिळणाऱ्या दह्यासारखं घट्ट दही घरीच बनवायचंय? मग 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा
दही
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 11:49 AM

मुंबई : आपल्या जेवनातील महत्वपूर्ण घटक म्हणजे दही आहे. उष्माघात आणि निर्जलीकरण यासारख्या समस्यांपासून आपल्या शरीराचे दही रक्षण करते. दही खाल्ल्याने आपली पाचन क्रिया निरोगी राहते. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, व्हिटामिन बी 6 आणि व्हिटामिन बी12 या पोषक घटकांचे प्रमाण अधिक असते. (To make thick curd at home Try this recipe)

दररोज दही खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. त्याचबरोबर हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठीही दही उपयुक्त आहे. मात्र, बऱ्याच जणांना बाजारातल्या सारखे दही तयार करता येत नाही. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी बाजारातल्या सारखे दही कसे तयार करायचे हे सांगणार आहोत. आपल्यापैकी बरेचजण दही तयार करताना थंड दुधात विरजन टाकतात.

यामुळे आपले दही हे घट्ट होत नाही आणि आंबटही होते. दुधामध्ये विरजन टाकताना अर्धा चमचापेक्षा जास्त विरजन घालायचे नाही. अनेक वेळा आपण एका भांड्यातून दुसऱ्या भांडात लावलेले दही टाकतो. यामुळे देखील दही पातळ होण्याची शक्यता असते. अनेक वेळा दही लावल्यानंतर त्याला चमचाने हलवले जाते. हे करणे चुकीचे आहे असे करत असाल तर दही पातळच होणार

बाजारातल्या सारखे घट्ट आणि मलाईदार दही पाहिजे असेल तर दूध किंचित कोमट झाल्यावर ताज्या दह्याचे विरजन त्यात घाला. दूध एक लिटर असेल तर एक चमचा विरजन , दोन लिटर असेल तर दोन चमचा विरजन जर तुम्हाला दही आंबट हव असेल तर त्यानुसार तुम्ही दही त्यामध्ये घाला. ज्या भांड्यात आपण दही तयार करत आहोत ते भांडे एकाच जागी ठेवा सारखे त्याची जागा बदलू नका. जेव्हा दही अंदाजे 6-8 तासात गोठते तेव्हा न ढवळता सुमारे दोन तास फ्रिजमध्ये ठेवा. यानंतर, बाजाराप्रमाणेच घट्ट, मलईदार दही घरच्या घरी तयार होईल.

दहीमध्ये एक लॅक्टिक अॅसिड असते. ज्यामुळे त्वचेचे संरक्षण होते. तसेच, उन्हाळ्याच्या हंगामात, त्वचेवर परिमाण होत असतो. चेहऱ्यासाठी दही उपयुक्त आहे. दहीमध्ये लिंबाचा रस घाला आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावल्यास उन्हापासून चेहऱ्याचे संरक्षण होते. त्वचेला आराम मिळतो आणि त्वचा साफ होते. तसेच, केसांमधील डान्ड्रफची समस्या काढून टाकण्यात दही देखील उपयुक्त आहे.

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(To make thick curd at home Try this recipe)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.