World Water Day 2021 : कोण म्हणाले होते तिसरे युद्ध पाण्यामुळे होणार, वाचा कसा सुरू झाला जल दिन ?
एक काळ आपल्याकडे असा होता की नद्या, तलाव, कालवे, विहिरी जागोजागी पाहायला मिळत होत्या.
मुंबई : एक काळ आपल्याकडे असा होता की नद्या, तलाव, कालवे, विहिरी जागोजागी पाहायला मिळत होत्या. परंतु औद्योगिकीकरणामुळे मोठे बदल झाले आणि जागोजागी दिसणारे कालवे, विहिरी गायब झाल्या. नद्यांचे पाणीही प्रदूषित होत आहे. जगभरातील लोकांना पाण्याचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी आणि लोकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी दरवर्षी 22 मार्च हा जागतिक जल दिवस म्हणून साजरा केला जातो. (Today is World Water Day 2021)
-जगातील पाण्याची कमतरता लक्षात घेत अंदाजे 32 वर्षांपूर्वी एक भविष्यवाणी केली गेली होती की, जर लोकांना वेळीच पाण्याचे महत्त्व कळले नाही तर पुढील महायुद्ध पाण्यासाठी होईल. असे म्हटले जाते की ही भविष्यवाणी संयुक्त राष्ट्राच्या सहाव्या सरचिटणीस, बुतरस घाली यांनी केली होती. एका भाषण दरम्यान, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जनतेला इशारा दिला होता की, आग पाण्यासाठी देखील लागू शकते. पुढचे महायुद्ध पाण्याच्या प्रश्नावरूनही होऊ शकते.
-जागतिक जल दिन साजरा करण्याचा आंतरराष्ट्रीय पुढाकार ब्राझीलमध्ये 22 मार्च 1992 रोजी रिओ दि जानेरो येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि विकासाच्या परिषदेत घेण्यात आला. 1993 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने महासभेत हा दिवस वार्षिक कार्यक्रम म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी सुमारे तीन चतुर्थांश पाण्याने भरलेले आहे. परंतु त्यातील केवळ तीन टक्के पिण्यायोग्य पाणी आहे. तीन टक्के बर्फ आणि हिमनदीच्या स्वरूपात आहेत.
-दरवर्षी संयुक्त राष्टाचे सदस्य असलेल्या देशांकडून हा दिवस साजरा केला जातो. त्यासाठी दरवर्षी एक नवी संकल्पना मांडली जाते. त्या संकल्पनेला अनुसरून वर्षभर उपक्रम राबवले जातात. यंदा ‘वेल्यूइंग वाटर,’ अशी जागतिक जल दिनाची थीम आहे.
-दरवर्षी जागतिक जल दिनाच्या निमित्ताने अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. भाषण, कविता आणि कथांद्वारे जलसंधारण आणि त्याचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जातात. सर्व प्रकारचे फोटो आणि पोस्टर्स शेअर करून लोकांना पाण्याचे महत्त्व समजावून सांगितले जाते.
-विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात बांधकाम केल्यामुळे निसर्गाने बरेच नुकसान झाले आहे आणि होत आहे. असे सर्व पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. झाडे सतत तोडली जातात, त्यांच्या तुलनेत कोणतीही नवीन झाडे लावली जात नाहीत. रस्त्यावर धावणारे वाहने व कारखान्यांमधून धूर निघत असल्याने प्रदूषण सातत्याने वाढत आहे. या कारखान्यांमधून येणारा कचरा नद्यांमध्ये जातो, त्यामुळे उर्वरित पाणीही दूषित होत आहे. झाडाच्या अभावी ऑक्सिजनचा अभाव आहे. यामुळे, पाण्याची पातळी खाली जात आहे.
संबंधित बातम्या :
World Water Day: जागतिक पाणी दिनानिमित्त जलशक्ती अभियानाची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घोषणा होणार
(Today is World Water Day 2021)