गजबजलेल्या मुंबईत वसलंय अत्यंत अद्भूत गाव, परदेशी लोक फिरायला येतात; तुम्ही कधी पाहिलंय का?

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. देशातील सर्वात मोठे उद्योग या शहरात आहे. हे शहर दिवसा आणि रात्री कधीच झोपत नाही. अव्याहतपणे सुरू असतं. अत्यंत गजबजलेलं आणि गर्दीने भरलेलं हे शहर आहे. कला, संस्कृती आणि परंपरेने नटलेलं हे शहर आहे. पाश्चात्य संस्कृतीचा पगडा असणारं हे शहर आहे. पण या शहरात एक अनोखं गावही वसलेलं आहे. त्या गावाचं नाव आहे...

गजबजलेल्या मुंबईत वसलंय अत्यंत अद्भूत गाव, परदेशी लोक फिरायला येतात; तुम्ही कधी पाहिलंय का?
KhotachiwadiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 26, 2024 | 7:22 PM

मुंबई गं नगरी बडी बांका, जशी रावणाची दुसरी लंका, वाजतो गं डंका, डंका चहुमुलखी… असं मुंबईचं वर्णन केलं जातं. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. अत्यंत गजबलेलं शहर आहे. देशातील प्रत्येक राज्याचा माणूस तुम्हाला मुंबईत पाहायला मिळतो. देशातीलच नव्हे तर विदेशातील लोकही मुंबई बघायला आवर्जुन येतात. मुंबईत पाहण्यासारखं खूप आहे. मुंबई राहण्यासारखीही आहे. मुंबईने आपलं स्वत:चं अस्तित्व जपलं आहे. मुंबईने आपल्या पाऊलखुणा जपल्या आहेत. मुंबईतील एक गाव हे त्यापैकीच एक आहे. देशातील इतर गावांपेक्षा मुंबईतील हे गाव अत्यंत वेगळं आहे. अत्यंत सुंदर आहे.

मुंबईत वसलेल्या या अद्भूत गावाचं नाव आहे खोताची वाडी. हे गाव इतकं अनोखं आहे की, केवळ देशातीलच नव्हे तर विदेशातूनही लोक या गावात फिरायला येतात. मलबार हिल्सच्या पायथ्याशी हे गाव आहे. खरं तर हे कोळी बांधवांचं गाव आहे. या गावात कोळी आणि पाठारे प्रभू समाजातील लोक राहत होते. तेच मुंबईचे मूळ रहिवाशी आहेत. वामन हरी खोत यांच्या नावावरून या गावाचं नाव खोताची वाडी असं पडलं. वामन हरी खोत यांनी जमिनीचे तुकडे पाडले आणि भारतीय ख्रिश्चन समुदायाच्या सदस्यांना वेगवेगळे भूखंड दिले.

 Khotachiwadi

Khotachiwadi

पोर्तुगीज स्टाईलची घरे

या गावात तुम्हाला पोर्तुगीज शैलीच्या वास्तू कलेचा नमूना पाहायला मिळेल. इथली घरे रंगबिरंगी आहेत. या घरांची ठेवणं वेगळ्या प्रकारची आहे. या ठिकाणी आधी 65 घरे होती. आता त्याची संख्या कमी होऊन 28 झाली आहे. कारण गगनचुंबी इमारतींनी जुनी घरे तोडली आहेत. या परिसरात फिरल्यानंतर पोर्तुगालमध्ये फिरल्याचा भास होतो. या ठिकाणी रोज अनेक परदेशी फिरायला येतात. या घरांसमोर उभं राहून फोटोही काढतात. जणू काही हे गाव म्हणजे जगातील आठवं आश्चर्य आहे, अशा पद्धतीने ते या गावाकडे पाहतात. या ठिकाणी राहणारे बहुतेक लोक हे मुंबईतील मूळ निवासी आहेत.

 Khotachiwadi

Khotachiwadi

संपूर्ण भारतातील वेगळं गाव

केवळ खोताची वाडीच नव्हे तर भारतात अशी असंख्य अनोखी गावे आहेत. कुलधरा येथील एका गावाला तर भूतांचं गाव म्हटलं जातं. देहराडूनच्या सहसपूर ब्लॉकमध्येही एक मक्केवाला गाव आहे.

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.