Best Shopping Places : मुंबईला फिरायला जाण्याचा विचार करताय; स्ट्रीट शॉपिंगसाठी प्रसिद्ध 5 ठिकाणांना नक्की भेट द्या

जर तुम्ही मुंबईला सहलीसाठी जाण्याचा प्लॅन करत असाल तर तिथं खरेदीकेल्याशिवाय मुंबईची सफर पूर्ण झाली, असं म्हणता येत नाही. तर, तुम्हाला मुंबईतील शॉपिंगची ठिकाणं तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे.

Best Shopping Places : मुंबईला फिरायला जाण्याचा विचार करताय; स्ट्रीट शॉपिंगसाठी प्रसिद्ध 5 ठिकाणांना नक्की भेट द्या
Mumbai Market
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 3:12 PM

मुंबई: भारतात अशी अनेक राज्ये आहेत जिथे भेट देण्यासाठी सुंदर पर्यटन स्थळेच नाहीत तर अतिशय प्रसिद्ध बाजारपेठा देखील आहेत. जर तुम्ही मुंबईला सहलीसाठी जाण्याचा प्लॅन करत असाल तर तिथं खरेदीकेल्याशिवाय मुंबईची सफर पूर्ण झाली, असं म्हणता येत नाही. तर, तुम्हाला मुंबईतील शॉपिंगची ठिकाणं तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. मुंबईतील बाजारांचे मुख्य आकर्षण म्हणजे येथे मिळणाऱ्या वस्तू आहेत. या बाजारपेठा राज्याच्या संस्कृतीचे आणि पोशाखाचेही दर्शन घडवतात. मुंबईच्या कोणत्या बाजारपेठांमध्ये तुम्ही खरेदीचा आनंद घेऊ शकता ते जाणून घेऊया.

स्ट्रीट शॉपिंगसाठी मुंबईतील 5 सर्वोत्तम ठिकाणे

कुलाबा कॉजवे

कुलाबा कॉजवे मुंबईच्या सर्वात लोकप्रिय बाजारपेठांपैकी एक आहे. या बाजारात बरीच वर्दळ दिसून येते. कृत्रिम दागिने, वैयक्तिक दागिने, प्रासंगिक पाश्चिमात्य पोशाख, पादत्राणे, पिशव्या ते प्राचीन वस्तूंपर्यंत, या ठिकाणी शॉपिंगला भरपूर वाव आहे. या ठिकाणी नेहमीच लोकांची गर्दी असते. इथं तुम्ही आनंदानं खरेदी करु शकता.

क्रॉफर्ड मार्केट

मुंबईत खरेदी करायची असेल तर क्रॉफर्ड मार्केटला तुम्ही भेट देणं आवश्यक आहे. क्रॉफर्ड मार्केट हे शहरातील सर्वात जुन्या बाजारपेठांपैकी एक आहे. फळे, भाज्या, पिशव्या, मेकअप, घरातील सजावटीच्या वस्तूंपासून ते खेळण्यांपर्यंत अनेक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळतील.

लिंकिंग रोड

विविध प्रकारचे परवडणारे आणि ट्रेंडी कपडे, दागिने, शूज लिंकिंग रोडवरील बाजारात मिळतील. मुंबईत रस्त्यावरील खरेदीच्या अनुभवासाठी लिंकिंग रोड आपल्या यादीत असणं आवश्यक आहे. लिकिंग रोड वांद्रे येथे आहे. हे शहरातील खरेदीदारांसाठी मोठ मार्केट आहे. येथील बाजारात काही ब्रँडेड शोरूम आणि बुटीक देखील आहेत.

हिल रोड

रस्त्यावरील खरेदीसाठी मुंबईतील आणखी एक ठिकाण म्हणजे हिल रोड हे आहे. येथील बाजारात खूप गर्दी असते. हिल रोडवर खरेदीसाठी जाणार असाल तर तुम्हाला भाव कमी करण्यासाठी बार्गेनिंग करण्याचं कौशल्य असणं आवश्यक आहे. याद्वारे तुम्ही येथे खूप कमी किंमतीत कपडे खरेदी करू शकाल.

हिंदमाता मार्केट

जर तुम्ही विविध प्रकारचे कापड, साड्या, ड्रेस मटेरियल आणि भारतीय पोशाख शोधत असाल तर थेट या दादर बाजारात जा आणि तुम्हाला जे काही शोधत आहात ते तुम्हाला मिळेल. ही सर्वात मोठी आणि सर्वात जुनी घाऊक कपड्यांची बाजारपेठ आहे. लग्नाच्या खरेदीसाठी उत्तम ठिकाण. तुम्ही तुमच्या बजेटनुसार येथे खरेदी करू शकता.

इतर बातम्या:

या 2 खेळाडूंमुळे मुंबईचा पराभव करु शकलो, विजयानंतर MS धोनीची प्रतिक्रिया

प्राचीन वारसा सांगणारी भारतातील 5 शहरं; पर्यटनासह इतिहास प्रेमींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू

चरणजीतसिंग चन्नी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, सोबत दोन मंत्र्यानाही दिली शपथ; पुढचा प्लॅन काय?

Best Shopping Places know details about These 5 Best Places for Street Shopping in Mumbai

'EVM मध्ये घोटाळा?', 'या' मुद्यावरून बाबा आढाव यांचं आत्मक्लेष उपोषण
'EVM मध्ये घोटाळा?', 'या' मुद्यावरून बाबा आढाव यांचं आत्मक्लेष उपोषण.
EVM मध्ये जुगाड? आता महाराष्ट्रातील या गावात होणार बॅलेट पेपरवर मतदान
EVM मध्ये जुगाड? आता महाराष्ट्रातील या गावात होणार बॅलेट पेपरवर मतदान.
'मी पुन्हा येईन..', 5 डिसेंबरला नव्या CM चा शपथविधी; भाजपची जंगी तयारी
'मी पुन्हा येईन..', 5 डिसेंबरला नव्या CM चा शपथविधी; भाजपची जंगी तयारी.
'या' 24 उमेदवारांचा EVM पडताळणीसाठी अर्ज; उमेदवारांचा EVMवर संशय अन्..
'या' 24 उमेदवारांचा EVM पडताळणीसाठी अर्ज; उमेदवारांचा EVMवर संशय अन्...
'संजय राऊत मेंटल, पागल... त्याच्या हातात दगडं द्या अन् फिर म्हणा...'
'संजय राऊत मेंटल, पागल... त्याच्या हातात दगडं द्या अन् फिर म्हणा...'.
...म्हणून महायुतीचा विजय, आय एम अल्सो इंजिनिअर; जानकरांचं मोठं वक्तव्य
...म्हणून महायुतीचा विजय, आय एम अल्सो इंजिनिअर; जानकरांचं मोठं वक्तव्य.
'काळजीवाहू मुख्यमंत्री खचले, चेहऱ्यावर हास्य नाही, त्यांचा चेहरा...'
'काळजीवाहू मुख्यमंत्री खचले, चेहऱ्यावर हास्य नाही, त्यांचा चेहरा...'.
मुख्यमंत्रिपदासाठी मुरलीधर मोहोळ यांचं नाव? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले,
मुख्यमंत्रिपदासाठी मुरलीधर मोहोळ यांचं नाव? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले,.
'जे चाललंय ते...', महायुतीच्या रखडलेल्या शपथविधीवरून पवारांचा हल्लाबोल
'जे चाललंय ते...', महायुतीच्या रखडलेल्या शपथविधीवरून पवारांचा हल्लाबोल.
मुंबईकरांचा प्रवास लवकरच आरामदायी होणार, काय आहे मोठी बातमी?
मुंबईकरांचा प्रवास लवकरच आरामदायी होणार, काय आहे मोठी बातमी?.