Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकांत अनुभवायचा असेल तर हिमाचल प्रदेशातील ‘या’ 5 ठिकाणी भेट द्या

हिमाचल प्रदेश हे असे एक गंतव्यस्थान अर्थात डेस्टिनेशन आहे कि जे पाहता क्षणीच तुमचे हृदय, मन आणि तन जिंकेल. तुमचा मागील जीवनातील सगळं थकवा दूर पळवून लावेल. (If you want to experience solitude, visit these five places in Himachal Pradesh)

एकांत अनुभवायचा असेल तर हिमाचल प्रदेशातील 'या' 5 ठिकाणी भेट द्या
एकांत अनुभवायचा असेल तर हिमाचल प्रदेशातील 'या' 5 ठिकाणी भेट द्या
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 4:05 PM

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश एक नैसर्गिक सौंदर्य लाभलेले व पर्यटनाच्या दृष्टीकोनातून अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे. या ठिकाणी निसर्गाने जणू सुख-आनंदाचीच मुक्तहस्ते उधळण केलेली आहे. म्हणूनच आयुष्यातून एकदा तरी हा नैसर्गिक नजारा आपल्या नजरेत साठवून घेण्यासाठी अनेकांची पावले याकडे वळतात. थक्क करणाऱ्या हिमालय पर्वतरांगा, बर्फाच्छादित शिखरे, प्राचीन मठ, हिरवे कुरण, चमकणारे तलाव आणि खोरी असे बरेच काही तुम्हाला उत्तर भारतातील या प्रसन्न प्रदेशात पाहायला मिळेल. हिमाचल प्रदेश हे असे एक गंतव्यस्थान अर्थात डेस्टिनेशन आहे कि जे पाहता क्षणीच तुमचे हृदय, मन आणि तन जिंकेल. तुमचा मागील जीवनातील सगळं थकवा दूर पळवून लावेल. तुम्हाला हे ठिकाण एवढे आवडेल कि येथून काढता पाय घेणे तुम्हाला नकोसे वाटेल. (If you want to experience solitude, visit these five places in Himachal Pradesh)

बर्फाच्छादित पर्वतांची सुंदर दृशे नजरेत साठवून ठेवण्यासाठी, आपल्या सभोवतालच्या निसर्गामध्ये भिजून आपले मन ताजेतवाने करण्यासाठी, सर्व प्रकारच्या पर्यटकांसाठी हे उत्तम ठिकाण आहे. हिमाचल प्रदेश हे एक पर्यटन स्थळ आणि ऑफबीट डेस्टिनेशन यांचे मिश्रण आहे. या परिसरातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांमध्ये शिमला, मनाली, कुलू, मॅकलोडगंज आणि धर्मशाला यांचा समावेश आहे, तर ऑफबीट डेस्टिनेशनमध्ये चितकुल, जिभी व इतर अनेक ठिकाणांचा समावेश आहे. ज्यांना गर्दीपासून दूर जायचे आहे, ज्यांना एकांताची गरज आहे, त्यांनी अवश्य हिमाचल प्रदेशला भेट दिली पाहिजे, येथील 5 ऑफबीट डेस्टिनेशन पुढीलप्रमाणे आहेत.

शोजा

सिराज खोऱ्यात वसलेले शोजा हे एक छोटेसे गाव आहे. मात्र पर्यटकांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. तुम्ही या परिसरात भव्य पर्वतांच्या दृश्यांचा आनंद घेऊ शकता. सेरोलसर तलावाला भेट देऊ शकता आणि ओक वृक्षांच्या छायेखाली पायी फिरू शकता.

रक्छाम

घनदाट जंगले आणि भव्य पर्वतांनी वेढलेले हे छोटेसे गाव. तुम्हाला या ठिकाणी निसर्गाच्या सौंदर्यात हरवल्यासारखे वाटू शकेल. तुम्ही येथील स्थानिकांशी मैत्री करू शकता आणि हिमालयीन काळ्या अस्वल, कस्तुरी हिरण, निळे मेंढी आणि बरेच काही पाहू शकता.

जंझेली

सर्व साहसी उत्साही लोकांसाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. या ठिकाणी चांगले सायकलिंग ट्रॅक, नॅचर ट्रेल्स, कॅम्पिंग स्पॉट्स आणि बरेच काही आहे. आपण ट्रेकसाठी देखील येथे जाऊ शकता. तुम्हाला येथे चित्तथरारक लँडस्केप दृश्यांचा आनंद घेता येईल.

जिभी

जर तुम्हाला देवदार वृक्षांच्या हिरव्यागार जंगलांमध्ये एकांत हवा असेल, शांत आणि आरामदायी जागा हवी असेल तर तुमच्यासाठी हे अत्यंत योग्य ठिकाण आहे. जिभी हे बंजार खोऱ्यात वसलेले एक छोटेसे गाव आहे. या ठिकाणी जुन्या लाकडी घरांचा एक क्लस्टर आहे. इथल्या जंगलात तुम्हाला अनेक दुर्मिळ पक्षी पाहायला मिळतील.

गुशैनी

आपल्या जोडीदारासह फिरण्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही गुशैनीची अवश्य निवड करा. तुम्ही तुमच्या मित्रांसह कॅम्पिंग स्पॉटही सेट करू शकाल. गुशैनी हे निसर्गप्रेमी आणि साहसी प्रेमींसाठी एक चांगले ठिकाण आहे. हिमाचल प्रदेशातील हे सर्वात शांत ठिकाण आहे, मात्र इकडे तुलनेत कमी प्रमाणात पर्यटक व निसर्गप्रेमी येतात. (If you want to experience solitude, visit these five places in Himachal Pradesh)

इतर बातम्या

Maruti च्या गाड्यांसाठी घरबसल्या लोन मिळणार, एक्सचेंज व्हॅल्यूसाठी शोरुममध्ये जाण्याची गरज नाही

iDelight Monsoon Bonanza: ICICI बँकेकडून कॅशबॅक ऑफर, कोणत्या वस्तूंवर किती सूट, जाणून घ्या…

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.