IRCTC Package: ‘भारत दर्शन’ ट्रेनने फिरुन या 7 ज्योतिर्लिंग, 13 दिवसांची टूर, खाण्या-पिण्या-राहण्याचा खर्च फक्त….

IRCTC म्हणजेच भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ या महिन्यात 24 ऑगस्टपासून 'भारत दर्शन ट्रेन' सुरु करणार आहे. या विशेष ट्रेनने तुम्ही 7 ज्योतिर्लिंगांना भेट देऊ शकाल. 24 ऑगस्ट रोजी सुटणारी ट्रेन 7 सप्टेंबर रोजी तुम्ही जिथून बसलात तिथे सोडेन. म्हणजेच एकूण 13 दिवसांचा हा धार्मिक दौरा असेल.

IRCTC Package: 'भारत दर्शन' ट्रेनने फिरुन या 7 ज्योतिर्लिंग, 13 दिवसांची टूर, खाण्या-पिण्या-राहण्याचा खर्च फक्त....
Bharat-Darshan-Train-IRCTC-Jyotirlinga-Package
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 8:15 AM

मुंबई : IRCTC  म्हणजेच भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ…. या महिन्यात 24 ऑगस्टपासून ‘भारत दर्शन ट्रेन’ सुरु करणार आहे. या विशेष ट्रेनने तुम्ही 7 ज्योतिर्लिंगांना भेट देऊ शकाल. 24 ऑगस्ट रोजी सुटणारी ट्रेन 7 सप्टेंबर रोजी तुम्ही जिथून बसलात तिथे सोडेन. म्हणजेच एकूण 13 दिवसांचा हा धार्मिक दौरा असेल.

आता जर तुम्ही विचार करत असाल की हे टूर पॅकेज महाग होणार नाही, खूप खर्च होणार नाही, ते बजेटच्या बाहेर पडणार नाही.. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की खर्चाचा विचार करू नका, हे आयआरसीटीसीचे अत्यंत किफायतशीर टूर पॅकेज आहे. तुम्हाला दररोज हजार रुपयांपेक्षाही कमी खर्च येणार आहे.

यात्रेची सुरुवात कुठून होणार?

आयआरसीटीसी म्हणण्यानुसार, गोरखपूरपासून प्रवास सुरु होईल. प्रवासी देवरिया, वाराणसी, जौनपूर शहर, सुल्तानपूर, लखनऊ, कानपूर आणि झाँशी येथून प्रवास सुरु करु शकतात. परत येतानाही ट्रेन याच स्थानकांवर थांबे घेईल. 24 ऑगस्टपासून सुरु होणारा हा प्रवास 13 दिवसांचा असेल आणि 7 सप्टेंबर रोजी ट्रेन परत येईल.

पॅकेज कितीचं असणार, आणि कोणकोणत्या सुविधा मिळणार?

या IRCTC पॅकेजचे शुल्क 12,285 रुपये प्रति प्रवासी आहे. या पॅकेजमध्ये प्रवाशांना ट्रेनच्या स्लीपर क्लासने प्रवास करणे, धर्मशाळा किंवा हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासह, त्यांना तिन्ही वेळा शुद्ध शाकाहारी अन्न मिळेल. या व्यतिरिक्त, बसेसद्वारे लोकल सहलीची सुविधा देखील दिली जाणार आहे.

कोणकोणत्या ठिकाणी फिरवलं जाणार?

ही विशेष ट्रेन उज्जैनला जाईल, जिथे भाविकांना ओंकारेश्वर आणि महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन दिले जाईल. यानंतर ही ट्रेन केवडियाला पोहोचेल, जिथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ ला भेट दिली जाईल. त्यानंतर ‘भारत दर्शन ट्रेन’ अहमदाबादला जाईल.

अहमदाबादमधील साबरमती आश्रमाला भेट दिल्यानंतर ही ट्रेन द्वारकेला जाईल. तेथे द्वारकाधीश मंदिर आणि सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यानंतर महाराष्ट्रात जाईल. घृणेश्वर ज्योतिर्लिंग, त्यानंतर नाशिकमधील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आणि पुण्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग येथे भेट दिली देईल. 13 दिवसांचा हा दौरा भाविकांसाठी अत्यंत किफायतशीर असल्याचे सांगितले जात आहे.

बुकिंग कसं करणार?

भारत दर्शन स्पेशल टूरिस्ट ट्रेनसाठी तुम्ही IRCTC च्या वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंग करु शकता. भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या साइटवर “भारत दर्शन स्पेशल टूरिस्ट ट्रेन” शोधल्यावर तुम्हाला या परवडणाऱ्या टूर पॅकेजची माहिती दिसेल. या लिंकवर तुम्हाला पॅकेजबद्दल अधिक तपशील मिळू शकतात (https://www.irctctourism.com/pacakage_description?packageCode=NZBD281)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.