IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, 100 टक्के सूट, 50 लाखांचा इन्शुरन्स

IRCTC BIG BLACK FRIDAY Offer: IRCTC ग्राहकांना 29 नोव्हेंबर रोजी IRCTC सी एअर वेबसाईट किंवा मोबाईल अ‍ॅपद्वारे केलेल्या सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाईट बुकिंगसाठी सुविधा शुल्कावर त्वरित 100 टक्के सूट देत आहे, ही ऑफर जाणून घ्या.

IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, 100 टक्के सूट, 50 लाखांचा इन्शुरन्स
Follow us
| Updated on: Nov 27, 2024 | 4:52 PM

IRCTC BIG BLACK FRIDAY Offer: तुम्हाला देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवास करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. कारण, आता तुम्हाला बुकिंगसाठी सुविधा शुल्कावर त्वरित 100 टक्के सूट मिळू शकते. हो हे शक्य आहे. कारण, IRCTC ची ‘बिग ब्लॅक फ्रायडे ऑफर’ सुरु झाली आहे. याविषयी जाणून घ्या.

सूट किती मिळणार?

‘मिनीरत्न पीएसयू’ इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC ने ‘बिग ब्लॅक फ्रायडे ऑफर’ सुरू केली आहे. यामध्ये प्रवाशांना विमानाचे तिकीट बुक केल्यास सुविधा शुल्कात 100 टक्के सूट मिळणार आहे. यामुळे IRCTC च्या ग्राहकांना एक शानदार ऑफर मिळू शकते. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना फ्लाईट बुकिंगवर फायदा होणार आहे.

ऑफरची मर्यादा काय?

IRCTC च्या ग्राहकांना 29 नोव्हेंबर रोजी IRCTC एअर वेबसाइट किंवा मोबाईल अ‍ॅपद्वारे केलेल्या सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाईट बुकिंगसाठी सुविधा शुल्कात त्वरित 100 टक्के सूट मिळेल. ही ऑफर केवळ शुक्रवारी बुक केलेल्या सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर लागू आहे.

IRCTC ने ‘बिग ब्लॅक फ्रायडे ऑफर’ सुरू केली आहे. प्रवाशांसाठी वर्षातून एकदा उपलब्ध होणारी ही ऑफर म्हणजे सर्वोत्तम किमतीत फ्लाईट बुक करण्याची संधी आहे.

एअर वेबसाईट किंवा मोबाईल अ‍ॅप

29 नोव्हेंबर 2024 रोजी, IRCTC ग्राहक IRCTC एअर वेबसाईट किंवा मोबाईल अ‍ॅपद्वारे केलेल्या सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाण बुकिंगसाठी सुविधा शुल्कावर त्वरित 100 टक्के सूटचा आनंद घेऊ शकतात.

50 लाख रुपयांचा मोफत ट्रॅव्हल इन्शुरन्स

IRCTC ने ‘बिग ब्लॅक फ्रायडे ऑफर’ सुरू केली आहे. प्रत्येक फ्लाइट बुकिंगवर 50 लाख रुपयांचा मोफत ट्रॅव्हल इन्शुरन्स आहे.

फायदा कसा घ्यावा?

IRCTC च्या ब्लॅक फ्रायडे ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्ही www.air.irctc.co.in किंवा IRCTC एअर मोबाइल अ‍ॅपद्वारे विमानाची तिकिटे बुक करू शकता. आपल्या प्रवासाची स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ही ऑफर चुकवू नका. www.air.irctc.co.in भेट द्या किंवा IRCTC एअरचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा आणि आजच आपले फ्लाईट बुक करा.

भविष्यातील सुट्ट्यांचे नियोजन करण्याची संधी

ब्लॅक फ्रायडे हा वर्षातील बहुप्रतीक्षित शॉपिंग दिवसांपैकी एक आहे. IRCTC प्रवाशांना त्यांच्या भविष्यातील सुट्ट्यांचे नियोजन करण्याची संधी देण्यासाठी उत्सुक आहे. हा खास ब्लॅक फ्रायडे डील प्रवाशांसाठी बचत आणतो, सणासुदीच्या सुट्ट्या, कौटुंबिक मेजवानीसाठी खास आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.