Hill Stations : मसुरी फिरण्याची योजना आखताय? मग, ‘या’ सुंदर हिल स्टेशन्सला नक्की भेट द्या!

मसुरी (Mussoorie) हे थंड हवेचे ठिकाण त्याच्या विलोभनीय सौंदर्यासाठी, तसेच त्याच्या आसपासच्या इतर सुंदर हिल स्टेशन्ससाठी देखील लोकप्रिय आहे. तुम्ही मसुरीला जाण्याची योजना आखत असाल, तर तुम्ही मसुरीजवळील काही लोकप्रिय ठिकाणांनाही भेट देऊ शकता.

Hill Stations : मसुरी फिरण्याची योजना आखताय? मग, ‘या’ सुंदर हिल स्टेशन्सला नक्की भेट द्या!
Hill stations
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 8:00 AM

मुंबई : मसुरी (Mussoorie) हे थंड हवेचे ठिकाण त्याच्या विलोभनीय सौंदर्यासाठी, तसेच त्याच्या आसपासच्या इतर सुंदर हिल स्टेशन्ससाठी देखील लोकप्रिय आहे. तुम्ही मसुरीला जाण्याची योजना आखत असाल, तर तुम्ही मसुरीजवळील काही लोकप्रिय ठिकाणांनाही भेट देऊ शकता. मसुरीच्या आसपासही काही उत्तम ठिकाणे आहेत.

जाणून घेऊया अशी कोणती हिल स्टेशन्स आहेत, जी मसुरीच्या प्रवासादरम्यान पाहायलाच हवीत. मसुरीजवळील ‘या’ हिल स्टेशन्सला भेट देण्याची योजना तुम्ही बनवू शकता

कनाटल

कनाटल हे एक हिल स्टेशन आहे जे मसुरी, दिल्ली, चंबा आणि ऋषिकेश सारख्या प्रमुख पर्यटन स्थळांच्या जवळ आहे. यामुळेच वीकेंडला भेट देण्यासाठी पर्यटक आणि स्थानिकांमध्ये कनाटल हे स्थळ लोकप्रिय आहे. येथे तुम्ही सुरकंदा देवी मंदिर, कोडिया फॉरेस्ट आणि टिहरी लेक सारख्या ठिकाणांना देखील भेट देऊ शकता.

देहराडून

हिमालयाच्या पायथ्याशी वसलेली, देहराडून ही उत्तराखंडची राजधानी आहे. हे ठिकाण नैसर्गिक दृश्यांसाठी लोकप्रिय आहे. जरी हे एक लहान शहर असले, तरीही ते इतर लोकप्रिय हिल स्टेशनला तगडी स्पर्धा देते. येथील आल्हाददायक हवामान पर्यटकांना वर्षभर या ठिकाणी भेट देण्यास आकर्षित करते. डेहराडून शहर उत्तर भारतातील इतर शहरांशी मुख्य मार्गाने जोडलेले आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गाने सहज पोहोचू शकता.

टिहरी

टिहरी, उत्तराखंडच्या जिल्ह्यांपैकी एक, सर्वात सुंदर जंगलात वसलेले शहर आहेत, जिथे आपण विविध वनस्पती आणि प्राणी पाहू शकता. येथील नद्या आणि पर्वतीय भूभाग हे अगदी पृथ्वीवरील स्वर्गासारखे वाटू शकतात. आशियातील सर्वात उंच आणि सर्वात मोठे धरण असलेले टिहरी धरण हे या ठिकाणचे एक पर्यटन आकर्षण आहे. याशिवाय, तुम्ही रॉक क्लाइंबिंग, रिव्हर राफ्टिंग आणि ट्रेकिंगसारख्या अनेक क्रियाकलापांमध्ये देखील सहभागी होऊ शकता.

धनौलती

येथून तुम्ही आसपासच्या हिमालयाच्या मनमोहक दृश्यांचा आनंद घेऊ शकता. येथे तुम्हाला ओक, देवदार आणि रोडोडेंड्रॉनची झाडे दिसतील. या ठिकाणी सांस्कृतिक वसाहत आहे, जिथे तुम्ही पारंपारिक गढवाली खाद्यपदार्थांचा आनंद घेऊ शकता आणि स्थानिक स्मृतीचिन्ह देखील खरेदी करू शकता. याशिवाय अनेक किल्ले आणि मंदिरे, फळबागा, जंगले फिरता येतात. तुम्ही एका लक्झरी रिसॉर्टमध्ये एक दिवस घालवणे हा पर्याय देखील निवडू शकता किंवा तुम्ही कॅम्पमध्ये रात्र घालवू शकता.

चकराता

चकराता हे सुंदर हिल स्टेशन हे बॅकपॅकर्ससाठी उत्तम ठिकाण आहे. हे देहराडूनपासून 90 किमी अंतरावर आहे. येथे तुम्हाला अनेक वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती पाहायला मिळतील. याशिवाय धबधबे आणि सुंदर पर्वतीय खिंड पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. येथे तुम्ही सायकलिंग आणि चालणे यापैकी आपल्या आवडीचा पर्याय निवडू शकता आणि ठिकाणाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी स्थानिकांशी संवाद साधू शकता.

हेही वाचा :

Winter Drinks : हिवाळ्याच्या दिवसांत झोपण्यापूर्वी अंजीर आणि दुधाचे सेवन करणे लाभदायी! जाणून घ्या त्याचे फायदे…

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी आहारात ‘या’ पौष्टिक पदार्थांचा समावेश करा!

Non Stop LIVE Update
सरवणकरांच्या धनुष्यबाणाला अमित ठाकरेंचा आधार, आमने-सामने आलेत अन्...
सरवणकरांच्या धनुष्यबाणाला अमित ठाकरेंचा आधार, आमने-सामने आलेत अन्....
उद्धव ठाकरेंनी वांद्रे पूर्वेत कुटुंबासह केलं मतदान, नागरिकांना आवाहन
उद्धव ठाकरेंनी वांद्रे पूर्वेत कुटुंबासह केलं मतदान, नागरिकांना आवाहन.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुटुंबियांसह बजावलं मतदानाचं कर्तव्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुटुंबियांसह बजावलं मतदानाचं कर्तव्य.
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कुटुंबासह नागपुरात बजावला मतदानाचा हक्क
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कुटुंबासह नागपुरात बजावला मतदानाचा हक्क.
कांदेंनी बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी आडवली, नेमकं काय घडल
कांदेंनी बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी आडवली, नेमकं काय घडल.
'राऊतांचाच कट जिहाद झालाय, जिहादची भाषा करूनही..',भाजप नेत्याचा घणाघात
'राऊतांचाच कट जिहाद झालाय, जिहादची भाषा करूनही..',भाजप नेत्याचा घणाघात.
अजित पवार भल्या सकाळी मतदानाला, बारामती काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क
अजित पवार भल्या सकाळी मतदानाला, बारामती काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क.
शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या वाहनावर गोळीबार, नेमकं काय झालं?
शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या वाहनावर गोळीबार, नेमकं काय झालं?.
विरारमध्ये कॅश कांड, तावडेंनी ५ कोटी वाटले? कोणत्या नेत्यान दिली टीप?
विरारमध्ये कॅश कांड, तावडेंनी ५ कोटी वाटले? कोणत्या नेत्यान दिली टीप?.
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी.