जगातील एकमेव देश जिथे कधीच होत नाही रात्र, फक्त 40 मिनिटांत उगवतो सूर्य
आम्ही तुम्हाला आज जगातील एका देशाबाबत सांगणार आहोत, त्या देशात भारतासारखी दिवस आणि रात्र नसते. तर या देशात 24 तास सूर्य तळपत असतो. तुम्हालाही धक्का बसला ना, पण हे खरं आहे.
निसर्ग अद्भूत आहे. निसर्गात अनेक गोष्टी घडत असतात. त्यामुळे निसर्गाचा थांगपत्ता लागणं कठीणच आहे. निसर्गाच्या चमत्कारामुळे वेगवेगळ्या देशात वेगवेगळी परिस्थिती पाहायला मिळते. जसे की, भारतात जर दिवस असेल तर अमेरिकेत रात्र असते. निसर्ग आणि खगोलीय घटनांचा हा परिणाम आहे. पण वेळ मागे पुढे असली तरी जगात रात्र आणि दिवस होतो हे फिक्स आहे. पण आम्ही तुम्हाला आज जगातील एका देशाबाबत सांगणार आहोत, त्या देशात भारतासारखी दिवस आणि रात्र नसते. तर या देशात 24 तास सूर्य तळपत असतो. तुम्हालाही धक्का बसला ना, पण हे खरं आहे.
ज्या ठिकाणी रात्र लहान असते अशी असंख्य ठिकाणे पृथ्वीवर आहेत. पण जिथे रात्रच होत नाही, असाही देश पृथ्वीवर आहे. या देशात रात्र असते पण ती काही मिनिटांचीच. जणू काही बत्तीगुल व्हावी आणि अर्ध्या तासाने वीजप्रवाह सुरु व्हावा अशा पद्धतीने या देशात रात्र होते. या देशात अत्यंत कमी वेळासाठी सूर्यास्त होतो, ही आश्चर्याची गोष्ट आहे. त्यामुळेच या देशात रात्र खूप छोटी असते. यूरोपीय खंडातील नॉर्वे या देशात रात्र अत्यंत कमी असते. रात्र थोडी आणि सोंगे फार ही म्हण जणू काही नॉर्वेसाठीच आहे की काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे.
40 मिनिटांची रात्र
हे महाद्वीप यूरोपात उत्तरेला आहे. उत्तर ध्रुवाच्या सर्वात जवळ असल्याने हा अत्यंत थंड प्रदेश आहे. हा देश बर्फाळ डोंगर आणि ग्लेशियरने भरलेला आहे. नॉर्वेत कधीच सूर्य अस्ताला जात नाही, असं म्हटलं जातं. नॉर्वेच्या हॅमरफेस्टमध्ये केवळ 40 मिनिटाची रात्र होते. इतर वेळी कडकडीत ऊन पडलेलं असतं.
सूर्यास्तच होत नाही
या ठिकाणी सूर्य दुपारी 12.43 वाजता अस्ताला जातो. केवळ 40 मिनिटानंतर लगेच सूर्योदय होतो. म्हणजे घड्याळात दीड वाजताच सूर्य उगवतो. विशेष म्हणजे हा क्रम रोज चालत नाही. किंवा एक दोन दिवस चालत नाही. तर तो अडीच महिने असतो. त्यामुळेच नॉर्वेला अर्धी रात्र आणि अर्धा सूर्योदय असलेला देशही म्हणतात. हा देश आर्कटिक सर्कलच्या आत येतो. या ठिकाणी मेपासून जुलैपर्यंत 76 दिवस सूर्यास्त होत नाही.
100 वर्षापासून सूर्य किरणच नाही
अशीच परिस्थिती हॅमरफेस्ट शहरात बघायला मिळते. नॉर्वे असा एकमेव देश आहे, जिथे 100 वर्षापासून सूर्याचे किरण पोहोचलेले नाहीत. कारण संपूर्ण शहर डोंगरांनी वेढलेलं आहे. त्यामुळेच पर्यटकांची या देशाला पहिली पसंती असते. एक तर भूगोलीय आश्चर्य, दुसरे बर्फाच्छादित डोंगर आणि निसर्ग सौंदर्य यामुळे पर्यटकांचे पाय नॉर्वेकडे आपोआप वळतात.