फक्त लक्षद्वीपच नाही, तर भारतातील ‘या’ सुंदर राज्यांमध्ये फिरायला जाणाऱ्यांना परमिटशिवाय एन्ट्री नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर लक्षद्वीप बेट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पण या सुंदर ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला परमिट घ्यावं लागतं. मात्र केवळ लक्षद्वीपच नाही तर भारतातील अशी अनेक राज्ये आहेत, जिथे फिरायला जाण्यासाठी तिथल्या स्थानिक प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते.

फक्त लक्षद्वीपच नाही, तर भारतातील 'या' सुंदर राज्यांमध्ये फिरायला जाणाऱ्यांना परमिटशिवाय एन्ट्री नाही
Follow us
| Updated on: Jan 12, 2024 | 10:36 PM

आपल्याला विदेशात फिरायला जायचं असलं तर आपल्याला पासपोर्ट आणि विजाची फार आवश्यकता असते. त्याशिवाय आपण आपल्याला हव्या असणाऱ्या देशात फिरायला जाऊ शकत नाही. या कागदपत्रांचं असणं बंधनकारक असण्यामागील कारण म्हणजे सुरक्षा. त्यामुळे तुम्ही कोणत्याही कामासाठी जा किंवा फिरायला जा, तुम्हाला त्या देशाचा विजा मिळणं आवश्यक असतं. तसेच तुमचा पासपोर्टदेखील महत्त्वाचा असतो. असं म्हटलं जातं की आपल्याला देशात फिरण्यासाठी पासपोर्ट किंवा कुठल्याही विजाची आवश्यकता नाही. अर्थात हे खरं आहे. पण भारतातील काही भागांमध्ये फिरायला जायतं असेल तर तुम्हाला विशेष परवानगी घ्यावी लागेल हे देखील तितकंच खरं आहे.

भारतातील असे काही निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहेत जिथे तुम्हाला फिरायला जायचे असेल तर विशेष परवानगी घेणं बंधनकारक आहे. सुरक्षेच्या कारणासाठी ही परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे तुम्ही अशा ठिकाणी प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुमची सर्व कागदपत्रे तयार असल्याची खात्री करा आणि प्रशासनाची इनर लाइन परमिट मिळवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर लक्षद्वीप बेट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पण या सुंदर ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला परमिट घ्यावं लागतं. मात्र केवळ लक्षद्वीपच नाही तर भारतातील अशी अनेक राज्ये आहेत, जिथे फिरायला जाण्यासाठी तिथल्या स्थानिक प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते.

अरुणाचल प्रदेश

उत्तर-पूर्वेकडील विविध संस्कृतीने समृद्ध असलेले हे राज्य आहे. अरुणाचल प्रदेशाच्या सीमा या चीन, भूतान आणि म्यानमार अशा तीन देशांशी संलग्न आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षतेसाठी संबंधित परिसरात जाण्यासाठी परवानगी घेणं महत्वाचे आहे. सोबतचं कोलकाता, शिलाँग, गुवाहाटी, दिल्ली यांसारख्या सुंदर शहरांमध्येदेखील फिरण्यासाठी तुम्हाला इनर लाइन परमिटची आवश्क्यता असते. परमिटची वेळ मर्यादा 30 दिवसांचा असतो. या काळात तुम्हाला सोबत आवश्यक महत्त्वाची कागदपत्र सोबत ठेवणे हे बंधनकारक असतं.

नागालँड

नागालँड हे राज्य अनेक जमातींचे निवासस्थान आहे. नागालँडपासून म्यानमारची आंतरराष्ट्रीय सीमा जवळ आहे. त्यामुळे तो परिसर संवेदनशील क्षेत्र मानला जातो. इथे फिरायला जाण्यासाठी तुम्हाला दिल्ली, कोलकाता, कोहिमा, दिमापूर, शिलाँग आणि मोकोकचुंग येथील उपायुक्तांकडून इनर लाइन परमिट तुम्हाला मिळू शकते. तसेच पॅन कार्ड आणि मतदार कार्ड या साह्याने तुम्हाला परवानगी मिळेल. इथे तुम्हाला 15 दिवसांच्या परमिटसाठी 50 रुपये आणि 30 दिवसांसाठी 100 रुपये खर्च करावे लागतील.

लडाख

लडाखमधील जमू-काश्मीरला लागून पाकिस्तानची सीमा असल्याने लडाखच्या काही भागांना भेट देण्यासाठी देखील परमिट अत्यंत आवश्यक आहे. हनु व्हिलेज, पँगॉन्ग त्सो लेक, त्सो मोरीरी लेक, न्योमा, लोमा बेंड आणि खारदुंग यांसारख्या ठिकाणी भेट देण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. पाकिस्तानची सीमा असल्याने तिथे लोकांना संपूर्ण लडाख फिरण्यास सक्त मनाई आहे. लडाखमध्ये फिरण्यासाठी फक्त एका दिवसाचे परमिट तुम्ही डीसी ऑफिसमधून घेऊ शकता.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.