भारतातील टॉप 7 राष्ट्रीय उद्यानांमध्ये दिसतात वाघ, कुटुंबासमवेत फिरण्यासाठी ही ठिकाणे आहेत परफेक्ट

हिवाळ्याच्या सुट्टीत जंगल सफारीचा विचार करत असाल तर भारतातील या टॉप नॅशनल पार्कचे प्लॅनिंग करा. येथे आपण वाघांना जवळून पाहू शकता आणि कुटुंबासह जंगली थरार अनुभवू शकता.

भारतातील टॉप 7 राष्ट्रीय उद्यानांमध्ये दिसतात वाघ, कुटुंबासमवेत फिरण्यासाठी ही ठिकाणे आहेत परफेक्ट
Follow us
| Updated on: Dec 06, 2024 | 6:37 PM

Top National Parks to See Tigers in December: हिवाळ्यातील थंड गार वारा तसेच मुलांच्या हिवाळी सुट्टीची मजा आणि जंगलात घालवलेले काही खास क्षण असे तुम्ही कुटुंबासोबत मिळून परिपूर्ण सुट्टीचे स्वप्न साकार करू शकता. वाघांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात जवळून पाहण्याचा थरार अनुभवायचा असेल तर डिसेंबर महिना हा उत्तम आहे. जगातील ७० टक्के वाघ ज्या भारतात राहतात तिथे तुम्ही काही खास राष्ट्रीय उद्यानांना भेट देऊन त्यांना पाहू शकता. या थंडीच्या दिवसात वाघ अनेकदा पाण्याजवळ सूर्यस्नान आणि विश्रांती घेताना दिसतात. त्यामुळे या डिसेंबरमध्ये जंगल सफारीचा प्लॅन करा आणि या प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पांमध्ये एक संस्मरणीय कौटुंबिक ट्रिपचा आनंद घ्या.

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड

हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे आणि वाघ पाहण्यासाठी सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. डिसेंबरच्या थंडीत वाघ अनेकदा येथे सूर्यस्नान करताना दिसतात. विशेषत: सैल झोनमध्ये. हिवाळ्यात इथल्या जीप सफारीचा रोमांचक अनुभव जरूर घ्या.

रणथंभौर राष्ट्रीय उद्यान, राजस्थान

राजस्थानच्या वाळवंट भागात वसलेले रणथंभौर राष्ट्रीय उद्यान येथे तुम्ही वाघजवळून पाहण्याची सुवर्णसंधी मिळते. कारण डिसेंबरमध्ये येथे पाण्याच्या काठावर आणि मोकळ्या जागेत वाघ दिसतात. या ठिकणी झाडे व झुडपे कमी असल्याने येथे सफारी करताना दृश्य स्पष्ट पणे दिसून येते.

बांधवगड राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेश

बांधवगड राष्ट्रीय उद्यानात भारतात वाघांची संख्या सर्वाधिक आहे. डिसेंबरमध्ये हिवाळाच्या दिवसांमध्ये वाघ त्यांच्या राहणाऱ्या भागातून आणि घनदाट जंगलातून बाहेर पडतात, जेणेकरून पर्यटकांना ते सहज पाहता येतात. इथले भग्नावशेष आणि जंगल यांच्यातील सफारी खरोखरच अद्भुत अनुभव देते.

कान्हा राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेश

हिरवीगार जंगले आणि विस्तीर्ण गवताळ प्रदेशांनी वेढलेले कान्हा राष्ट्रीय उद्यान वाघांसाठी चांगले ठिकाण आहे. डिसेंबरमध्ये तुम्हाला या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ वाघांची वर्दळ अधिक बघायला मिळेल, त्यामुळे तुमची ही सफारी अधिक रोमांचक होते.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्र

महाराष्ट्रातील या घनदाट जंगलात डिसेंबरमध्ये वाघ दिसणे हा खरोखरच संस्मरणीय अनुभव ठरू शकतो. येथील मोहर्ली आणि कोलसा झोनमध्ये जीप सफारीदरम्यान वाघ दिसणे सामान्य आहे. त्यामुळे तुम्ही या उद्यानाला भेट देऊ शकता.

सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल

सुंदरबनमधील खारफुटीचे जंगल आणि इथली अनोखी बोट सफारी याला खास बनवते. डिसेंबरच्या थंड हवामानात येथे वाघ दिसण्याची शक्यता थोडी जास्त असते, पण त्यासाठी थोडा संयम आणि नशिबाची गरज असते. युनेस्कोनेही या जंगलाचा जागतिक वारसा स्थळात समावेश केला आहे.

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम

एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेला काझीरंगा येथे तेवढ्याच प्रमाणात वाघ आहे. डिसेंबरमध्ये थंडीच्या वातावरणात येथे वाघ सहज पाहायला मिळतात. हिवाळ्यात वाघ आणि एकशिंगी गेंडा जंगलातून बाहेर पडतात. फोटोग्राफीसाठीही ही जागा खूप चांगली आहे. डिसेंबरमध्ये या राष्ट्रीय उद्यानांना भेट दिल्यास वाघ पाहण्याची संधी तर मिळतेच, शिवाय निसर्गसौंदर्याचा ही आनंद घेता येतो.

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.