हिवाळ्यात लहान मुलासोबत फिरायला जाताय? तर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
बाहेर फिरायला तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. बाहेर फिरल्यामुळे आपला माईंड फ्रेश राहतो. जर तुम्ही लहान मुलासोबत प्रवास करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा. जेव्हा तुम्हाला वाटत असेल की त्याचा मूड आता खराब आहे, तेव्हा तुमच्या मुलांना व्हिडिओ दाखवा.
हिवाळा हा असा ऋतू आहे जो खूप आल्हाददायक असतो. बहुतेक लोकांना हिवाळ्यातील थंड वातावरण खूप आवडते. अशा तऱ्हेने अनेकजण हिवाळ्यात कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याची वाट पाहत असतात. पण हिवाळ्यात हवामान बदलामुळे व्हायरस पसरण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. यात लहान मुलांसोबत थंडीत कुठेतरी ट्रिपला जाण्याचा बेत आखत असलेल्यांनी थोडी सावधगिरी बाळगावी. प्रवासादरम्यान तुमचा थोडासा निष्काळजीपणा बाळाला आजारी पाडू शकतो.
जर तुम्ही फिरायला गेलात आणि तुमचं मूल आजारी पडलं तर संपूर्ण ट्रिप खराब होते. मुलांच्या तब्येतीकडे सर्वांचे लक्ष असते. हिवाळ्यात तुम्ही तुमच्या लहान मुलासोबत कुठेतरी जाणार असाल तर काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही कोणत्याही टेन्शनशिवाय फिरू शकाल.
ठिकाणांची चौकशी करा
जर तुम्ही मुलासोबत फिरायला जाणार असाल तर फिरण्यासाठी सुरक्षित ठिकाण निवडा. त्यासाठी आधी त्या ठिकाणांची माहिती काढून घ्या कि त्या ठिकाणी इमर्जन्सी कॉन्टॅक्ट, हॉस्पिटल आणि फॅमिली हॉटेलची या सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत कि नाही.
उबदार कपडे आणि एक्स्ट्रा शूज ठेवा
थंडीच्या दिवसात लहान मुलांसोबत फिरायला जाणार असाल तर त्यांचे उबदार कपडे बरोबर घेऊन ठेवा. उबदार कपड्याने मुलांचे थंडीपासून बचाव होतो. यासोबतच तुम्ही मुलाचे एक्स्ट्रा शूजही घ्यावेत. मुलांना थंडीच्या दिवसात बाहेर जाताना उबदार टोपी घाला.याने मुलांना सर्दी होणार नाही. लक्षात ठेवा टोपीचे फॅब्रिक असे असावे की ज्यामुळे मुलाला त्रास होणार नाही.
प्रवासाचा तपशील शेअर करा
तुमच्या प्रवासाची माहिती कुटुंबातील इतर सदस्यांना शेअर करा. तुमचे राहणायचे ठिकाण, विमान, ट्रेन किंवा बसच्या तपशीलांसह असलेली माहिती शेअर करा. कुटुंबाला तुमच्या प्रवासाची संपूर्ण वेळापत्रकाची माहिती असणं गरजेचं आहे, काही सेफ्टी टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या लहान मुलासोबत सहज फिरायला जाऊ शकता.
मुलांचे आवडते कॉमिक्स आणि व्हिडिओ तयार ठेवा
मुलांसाठी त्यांचे आवडते व्हिडिओ तुमच्या फोनवर डाउनलोड करा. जेव्हा तुम्हाला वाटत असेल की त्याचा मूड आता खराब आहे, तेव्हा तुमच्या मुलांना व्हिडिओ दाखवा. शक्य असल्यास, त्यांचे आवडते कॉमिक्स तुमच्यासोबत घ्या जेणेकरून तुम्ही त्यांना वाटेत दाखवू शकाल.