AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिंपल्स पाठ सोडत नाहीयेत ? एकदा ट्राय करून बघा दालचिनीचा फेसपॅक

चेहऱ्यावर पिंपल्स पुन्हा पुन्हा येत असतील तर एकदा दालचिनीचा फेस पॅक लावून बघा.

पिंपल्स पाठ सोडत नाहीयेत ? एकदा ट्राय करून बघा दालचिनीचा फेसपॅक
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 10:19 AM

नवी दिल्ली : ॲक्ने आणि पिंपल्सची (acne and pimples) समस्या अशी आहे की ती चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य डागाळते. पिंपल्समुळे चेहऱ्याची चमकही दडपून जाते. अनेक लोक मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक उत्पादने (products) वापरतात, परंतु बऱ्याच वेळेस ही समस्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढते. अशा परिस्थितीत, पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी स्वयंपाकघरात उपस्थित असलेल्या दालचिनीचा (cinnamon) वापर फायदेशीर ठरू शकतो. दालचिनी केवळ जेवणाची चव वाढवण्यासाठीच ओळखली जात नाही, तर त्यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरिअलची समस्या दूर करण्यातही मदत करतात.

चेहऱ्यासाठी डालचिनीचा वापर कसा करावा ते जाणून घेऊया.

दालचिनी आणि लिंबू

हे सुद्धा वाचा

दालचिनी आणि लिंबाचा रस पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो, खरं तर दालचिनीमध्ये अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात जे ॲक्ने आणि मुरुमं होऊ देत नाहीत. दुसरीकडे, लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते, ज्यामुळे त्वचा चमकदार होते. यासाठी एक चमचा दालचिनी पावडरमध्ये एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळा. आता हे मिश्रण 10 मिनिटे चेहऱ्यावर लावा. हे मिश्रण लावल्याने पिंपल्स दूर होतात तसेच त्वचा सुधारते.

दालचिनी आणि दही

दालचिनीमध्ये अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात आणि दही चेहरा थंड करून पिंपल्सची समस्या सहज दूर करू शकते. याशिवाय दह्यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करतात. याचा वापर करण्यासाठी एक चमचा दालचिनी पावडर, एक चमचा दही मिसळून मिश्रण तयार करा. मिश्रण चेहऱ्यावर 5 ते 10 मिनिटे ठेवा. यानंतर ते धुवा. असे केल्याने पिंपल्सची समस्याही दूर होईल आणि रंगही उजळेल.

नारळाचे तेल व दालचिनी

खोबरेल तेल आणि दालचिनीचा फेस पॅक लावल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होऊ शकतात. या दोन्हींचा वापर करण्यासाठी एक चमचा दालचिनी पावडर आणि एक चमचा खोबरेल तेल घेऊन दोन्हीचे मिश्रण बनवा. आता हे मिश्रण 5 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. अशा प्रकारे चेहऱ्यावर दालचिनी लावल्याने त्वचेला पोषण मिळण्यासोबतच पिंपल्सची समस्या दूर होईल.

दालचिनी व मध

दालचिनी आणि मधाने पिंपल्सच्या समस्येवरही आराम मिळू शकतो. ते वापरण्यासाठी एक चमचा दालचिनी पावडर, आवश्यकतेनुसार दोन चमचे मध आणि कच्चे दूध घ्या. 10 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा. अशा प्रकारे दालचिनी लावल्याने पिंपल्सपासून सुटका होण्यासोबतच त्वचेच्या इतर अनेक समस्याही दूर होतील, त्वचेला पोषण मिळेल.

रायगडचं पालकमंत्रिपद गावगुंडाकडे नको, राऊतांचा नाव न घेता गोगावलेंना
रायगडचं पालकमंत्रिपद गावगुंडाकडे नको, राऊतांचा नाव न घेता गोगावलेंना.
चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले
चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले.
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार.
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई.
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी.
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....