Skin Care Beauty Tips | हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते ? मग हे घरगुती फेसपॅक नक्की ट्राय करा
फेसपॅक त्वचेसाठी अतिशय चांगला आहे. हा फेसपॅक तयार करण्यासाठी दोन चम्मच ऑलिव्ह ऑईल घ्यावे. त्यामध्ये एक चम्मच कॉफी पावडर मिसळून त्याचे चांगले मिश्रण करावे. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्याला लावून पंधरा मिनिटानंतर कोमट पाण्याने धुवून टाकावे.
मुंबई : सध्या हिवाळा ऋतू सुरु आहे. या दिवसात त्वचा कोरडी, निस्तेज होते. त्यामुळे या काळात त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. हिवाळ्यात मुलायम आणि तजेलदार त्वचा हवी असल्यास खालील खरगुती फेसपॅक नक्की ट्राय केले पाहिजेत.
ऑलिव्ह ऑईल-कॉफी पावडर फेस पॅक
हा फेसपॅक त्वचेसाठी अतिशय चांगला आहे. हा फेसपॅक तयार करण्यासाठी दोन चम्मच ऑलिव्ह ऑईल घ्यावे. त्यामध्ये एक चम्मच कॉफी पावडर मिसळून त्याचे चांगले मिश्रण करावे. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्याला लावून पंधरा मिनिटानंतर कोमट पाण्याने धुवून टाकावे.
चंदन पावडरचा फेसपॅक
त्वचेला ग्लो हवा असेल तर हा फेसपॅक चांगला आहे. एक चम्मच चंदन पावडर घ्या. त्यामध्ये एक चम्मच मध मिसळा. तसेच एक ते दोन चम्मच कोरफडीचे तेल मिसळावे. या फेसपॅकमुळे त्वचा हायड्रेट राहते. हे मिश्रण पंधरा मिनिटे ठेवून कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्यावा.
बिटरूट आणि मुलतानी माती फेसपॅक
एका भांड्यात एक चम्मच मुलतानी मातीचे पावडर घ्या. यामध्ये तीन ते चार चमचे बीटरुटचे पावडर घ्या. त्यानंतर एक ते दोन चम्मच दही तसेच एक ते दोन थेंब बदामाचे तेल या मिश्रणामध्ये मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर पंधरा मिनिटे लावावे. त्यानंतर 15 मिनिटांनंतर चेहऱ्याला धुवावे. यामुळे चेहरा मुलायम होतो.
खोबरेल तेल आणि साखरेचा फेस पॅक
थंडीमध्ये कोरडी तसेच निस्तेज झालेल्या त्वचेपासून मुक्तता हवी असेल तर खोबरेल तेलाचा वापर केला जातो. एका भांड्यात एक किंवा दोन चम्मच खोबरेल तेल घ्या. यामध्ये बारिक केलेल्या साखरेचे पावडर टाका. कोरड्या पडलेल्या त्वचेवर हे मिश्रण लावा. विस मिनिटानंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ करावी. त्यानंतर त्वचा मुलायम वाटेल.
इतर बातम्या :
Lips Care : हे होममेड लिप स्क्रब ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या याबद्दल!
Skin Care : या गोष्टी कॉफीसोबत चुकूनही घेऊ नका, होऊ शकते मोठे नुकसान!